जाणीव फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम
रत्नागिरी, ता. 13 : येथील जाणीव फाउंडेशन (Jaaniv Foundation) या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनातून निवेंडी भगवती नगर येथील नदीचा गाळ उपसला आणि निवेंडीतील या नदीने मोकळा श्वास घेतला. याचा फायदा शिगणवाडी व नमसलेवाडीला होणार आहे. The silt of the river in Nivendi was lifted

या नदीतील गाळ गेली कित्येक वर्ष उपसण्यात आला नव्हता. त्यामुळे जवळील शेतीचे प्रचंड नुकसान होत असे. नदीजवळील सर्व शेतात आणि घरात पाणी येत असे. या अडचणींना ग्रामस्थांना दरवर्षी सामोरे जावे लागते ही समस्या अमेरिकन फार्मास्युटीकल कंपनीचे (American Pharmaceutical Company) संचालक डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी लक्षात घेऊन त्यांनी जाणीव फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमांतून हा उपक्रम करण्याचे जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांना सुचविले. त्यानंतर त्यांनी नदीची पाहणी केली. ग्रामपंचायतीचे याकरिता सहकार्य लाभले. The silt of the river in Nivendi was lifted

सर्व सरकारी परवानग्या घेऊन या नदीचे काम जयगड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, डॉ. चंद्रशेखर निमकर, भगवतीनगर ग्रामपंचायत सरपंच प्रगती प्रमोद भोसले, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांच्या उपस्थितीत कामाचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी जाणीव फाउंडेशनचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आम्ही जाणीवचे नवनवीन उपक्रम पाहतो, असे सांगितले. डॉ. निमकर यांनी जाणीवच्या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात पाणी ही काळाची गरज आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावातील नागरिकांनी पुढे येऊन असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे, असे सांगितले. यावेळी दोन जेसीबी आणि लोकसहभागातून चार दिवस काम पूर्ण करण्यात आले. The silt of the river in Nivendi was lifted

या दरम्यान जाणीव फाउंडेशनचे अवधूत मुळ्ये, उमेश महामुनी, निवेंडी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शिर्के, तेजल पोमेंडकर, पोलीस पाटील नितीन मायंगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले, सीआरपी काजल सावंत, ग्रामस्थ नंदकुमार यादव, शंकर आंबेकर, प्रकाश भोसले, अमेय शिगवण, देवीदास शिगवण, वासुदेव शिगवण आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. The silt of the river in Nivendi was lifted

