• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 December 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शेतकरी हाच खरा अन्नदाता

by Guhagar News
November 11, 2024
in Ratnagiri
139 2
0
The real food provider is the farmer
274
SHARES
782
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शशिकांत लिंगायत; विद्यार्थ्यांनी घेतला भात कापणीचा अनुभव

रत्नागिरी, ता. 11 : महात्मा गांधीजींच्या विचारप्रणाली नुसार खरा भारत देश हा खेड्यात नांदतो. त्यांच्या खेड्याकडे चला या विचारानुसार ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळावा म्हणून अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबीर कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयात सुरू आहे. या शिबिरात 11वी आणि 12वी मधील 63 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. ‘ग्राम विकासातून व्यक्तिमत्व विकास’ या संकल्पनेला अनुसरून विविध उपक्रमांचे आयोजन शिबिरात केले आहे. The real food provider is the farmer

स्वयंसेवकांनी कुर्धे गावातील शेतकरी श्री. शशिकांत लिंगायत यांच्या शेतात भात कापणीचा अनुभव घेतला. यावेळी स्वयंसेवकांनी भात शेती लागवडीची संपूर्ण माहिती करून घेतली. भात शेतीसाठी वापरलेले बियाणे, खते याची माहिती करून घेतली. यावर्षी कोमल हे 100 ते 120 दिवसात होणारे बियाणे पेरले आहे. शेण खताचा वापर करून सेंद्रिय शेतीचा पुरस्कार त्यांनी केला आहे. शेतीची माहिती घेत असताना विद्यार्थ्यांना शेतात काम करीत असताना किती श्रम पडतात याची जाणीव झाली. भात कापताना डोक्यावर तळपणारा सूर्य, भाताची लागणारी खाज, भातातील विविध कीटक, कसरुंड यांचा होणारा त्रास अनुभवला आणि ताटात उपलब्ध अन्नापाठी किती श्रम आहेत हे मुलांना कळले. The real food provider is the farmer

The real food provider is the farmer

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुर्धे गावातील श्री. शशिकांत लिंगायत सौ. स्वप्नजा लिंगायत यांनी सहकार्य केले व मुलांना अल्पोपहार दिला. सर्व स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी भात कापणीत मनापासून सहभागी झाले. कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर यांनी सर्वांचे आभार मानले. The real food provider is the farmer

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe real food provider is the farmerUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.