बौद्ध तरुणांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही ; शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद कासारे
गुहागर, ता.18 : भगवान गौतम बुद्धांचा विज्ञानवादी धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना दिला. त्याचे योग्य पालन आपण करायला हवे. सद्या नोकरी मिळत नाही म्हणून बौद्ध तरूणांमध्ये निराशा पसरली आहे. मात्र, त्यामुळे शिक्षण सोडू नका. शिक्षण हाच आपल्या सर्वांगीण प्रगतीचा राजमार्ग आहे. आपल्या बौद्ध तरुणांना त्या शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन गुहागर पंचायत समितीच शिक्षण विस्तार अधिकारी श्री. मुकुंद कासार यांनी केले. ते वेळंब येथे श्रावस्ती बुद्ध परिवेणमध्ये वर्षावासाची सांगता कार्यक्रमात बोलत होते. The program endowed in Welamb

श्री. कासार पुढे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितित मी शिक्षण घेतले व माझ्या परिवाराने तोच कित्ता गिरवला. हाच आदर्श समाजा समोर ठेवला. मी केवळ शिक्षक नाही तर शेतकरी सुद्धा आहे. शेतीचे अनेक पुरस्कार व बक्षिसे मला मिळाली आहेत. निवृती नंतर मी समाज कार्य व शेतीत लक्ष घालणार आहे. म्हणून आजच्या तरुणानी नोकरी नाही म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. शिक्षणाशिवाय बौद्ध तरुणांना पर्याय नाही असे श्री. कासारे म्हणाले. The program endowed in Welamb
या कार्यक्रमाला माजी गटविकास अधिकारी श्री. मिलिंद पवार उपस्थित होते. त्यानी छोट्या मुलांनी बुद्ध पूजापाठ चांगला केल्याबद्दल समाधान व्यवत्त केले. कोकणातील वाडी, वस्तीवर पायी प्रवास करून माझे वडिल देवराम पवार यांनी धर्मांतरानंतर बुद्ध पूजा घराघरात नेली. बुद्धांची शिकवण त्यांनी स्वतः अंगिकारली व इतरांना दिली. वेळंब हे त्यातील एक मुख्य गाव आहे. त्यामुळे आजच्या यावर्षावास कार्यक्रमाला उपस्थित राहून मला खरोखर समाधान वाटले असे मिलिंद पवार यांनी स्पष्ट केले. The program endowed in Welamb

या कार्यकमात भगवान बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाच पठण एका विद्यार्थिनीने केले. वर्षावासात सहभागी झालेल्या सर्व मुलांना संस्थेच्या मुंबई व गाव शाखेच्या वतीन बुद्ध वंदना पुस्तिका, वही – पेन, कंपास बॉक्स, टिफीन भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव शशिकांत जाधव यांनी केले. तर कार्यकमाचे अध्यक्षस्थान उपाध्यक्ष मिलिंद जाधव यांनी स्विकारले . या कार्यक्रमाला वाडीतील सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. The program endowed in Welamb