• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
10 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलीस शिपाई संवर्गातील 14,956 पदे भरणार

by Mayuresh Patnakar
October 28, 2022
in Maharashtra
21 0
0
The police will fill the posts of sepoy cadre
41
SHARES
118
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : महाराष्ट्रातल्या पोलीस (Maharashtra Police) भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा आदेश काढण्यात आला आहे. त्याप्रमाणे पोलीस शिपाई या संवर्गातील तब्बल 14 हजार 956 पदे भरली जाणार आहेत. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अशी आहे. The police will fill the posts of sepoy cadre

या संदर्भात पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयातून प्रसिध्द झालेल्या पत्रकावरुन खालील माहित देत आहोत.

14956 पोलीस शिपाई भरती

पोलीस शिपाई भरतीसाठी आवेदनपत्र भरताना पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येई. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर उपलब्ध रहाणार आहे.

सदर जाहीरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या 1 टक्का आरक्षित जागा विचारात घेवून रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी. त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज करु शकतात. परंतू खुल्या प्रवर्गातील उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत. The police will fill the posts of sepoy cadre

पात्रता

पदाचे नाव – पोलीस शिपाई
पद संख्या – 14, 956 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
वयोमर्यादा –  खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क –  खुला प्रवर्ग: रु. 450 /- ;  मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 3 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
(सर्वांनी https://mahasarkar.co.in/policerecruitment2022-mahait-org/ या संकेतस्थळावर अर्ज भरताना पात्रता, नियम, अटी व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.)

एका उमेदवाराला एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाहीत.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारी प्रथम 50 गुणांची शारिरीक योग्यता परीक्षा घेण्यात येईल. या चाचणीमध्ये किमान 25 गुण (50 टक्के) गुण मिळविणाऱ्या उमेदवारांमधुन संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40 गुण (40 टक्के) गुण मिळविणे अनिवार्य आहे. यापेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. The police will fill the posts of sepoy cadre

लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यामुळे अर्जदाराने ऑनलाईन आवेदन भरताना सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

शारिरीक व लेखी परीक्षामध्ये नमुद केलेल्या दोन्ही निकषांच्या आधारे उमेदवारांमधुन गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

गुणवत्ता यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. त्यामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल. त्यामुळे निवडसुचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. The police will fill the posts of sepoy cadre

महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिक्त

बृहन्मुंबई – 6740 (खुला प्रवर्ग 2561)
ठाणे शहर – 521 (खुला प्रवर्ग 245)
पुणे शहर – 720 (खुला प्रवर्ग 76)
पिंपरी चिंचवड – 216 (खुला प्रवर्ग 119)
मिरा भाईंदर – 986 (खुला प्रवर्ग 333)
नागपूर शहर – 308 (खुला प्रवर्ग 218)
नवी मुंबई – 204 (खुला प्रवर्ग 169)
अमरावती शहर –    20
सोलापूर शहर – 98 (खुला प्रवर्ग 37)
लोहमार्ग मुंबई – 620 (खुला प्रवर्ग 301)
ठाणे ग्रामिण – 68 (खुला प्रवर्ग 37)
रायगड – 272 (खुला प्रवर्ग  109)
पालघर – 211 (खुला प्रवर्ग 65)
सिंधुदूर्ग – 99 (खुला प्रवर्ग 40)
रत्नागिरी – 131 (खुला प्रवर्ग 63)
अहमदनगर – 129 (खुला प्रवर्ग 24)
धुळे – 42
कोल्हापूर – 24 (खुला प्रवर्ग 6)
पुणे ग्रामीण – 579 (खुला प्रवर्ग 173)
सातारा – 145 (खुला प्रवर्ग 76)
सोलापूर ग्रामीण – 26
औरंगाबाद ग्रामीण – 39 (खुला प्रवर्ग 9)
नांदेड – 155 (खुला प्रवर्ग 26)
परभणी – 75 (खुला प्रवर्ग 22)
हिंगोली – 21 (खुला प्रवर्ग 2)
नागपूर ग्रामीण – 132 (खुला प्रवर्ग 50)
भंडारा – 61 (खुला प्रवर्ग 23)
चंद्रपुर – 194
वर्धा – 90 (खुला प्रवर्ग 34)
गडचिरोली – 348
गोंदिया – 172 (खुला प्रवर्ग 67)
अमरावती ग्रामीण – 156 (खुला प्रवर्ग 59)
अकोला –     327 (खुला प्रवर्ग 139)
बुलढाणा – 51 (खुला प्रवर्ग 22)
यवतमाळ – 244 (खुला प्रवर्ग 84)
लोहमार्ग पुणे – 124 (खुला प्रवर्ग 45)
लोहमार्ग औरंगाबाद – 154 (खुला प्रवर्ग 59)

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtra PoliceMarathi NewsNews in Guhagarpolice recruitmentThe police will fill the posts of sepoy cadreUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यामहाराष्ट्र पोलीसलोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.