माधवी पाटिल, जि.प.आदर्श शाळा कुडली नं.४
Guhagar news : विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी निरिक्षणक्षमता वाढणे महत्त्वाचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील कृती केल्यास त्यांची निरीक्षण क्षमता वाढू शकते. शाळेतून घरी येताना वाटेत दुकानातील वस्तूंचे, फलकाचे निरीक्षण करावे. फलकाचे नाव वाचावे, वस्तूंची नावे, पिशवी वरील नावे दुकानाची मांडणी , रंग यांचे निरीक्षण करणे. दुकानाची केलेली रचना, बाजारपेठेतील दुकाने, हॉटेल्स, गाड्यांची नावे वाचण्यास सांगावीत. उदाहरणार्थ अमेय जनरल स्टोअर्स, क्रांती स्टोअर्स, इत्यादी फलकांची नावे विद्यार्थ्यांनी वाचावीत. आजूबाजूचा परिसर सुद्धा विद्यार्थ्यांनी ओळखता यावा. रस्त्यावरून चालत असताना परिसरात दिसणारी शेती, नद्या, शाळा, कॉलेज यांचे निरीक्षण करण्यासाठी सांगून त्यावर आधारित किमान दहा ओळी निबंध त्यांनी लिहावा. यामुळे निरीक्षण क्षमते बरोबरच लेखन कौशल्य ही वाढीस लागते. The observation ability of students should be enhanced

निरीक्षण क्षमते बरोबर एकाग्रता क्षमता विकसित करावी. यासाठी विद्यार्थ्यांना काही खेळ खेळण्यास सांगावेत. उदाहरणार्थ लगोरी खेळ, खो-खो, गणिती खेळ यामध्ये आपण सापशिडीचा खेळ घेऊ शकतो किंवा चित्रांचे निरीक्षण करण्यास सांगावे. विद्यार्थ्यांकडून उतारा वाचून घ्यावा. वाचताना जो चुका करेल व त्याचे अशुद्ध उच्चार जो शोधेल त्याला नंतर वाचण्याची संधी द्यावी. त्यामुळे विद्यार्थी वाचण्याच्या आवडीमुळे सुद्धा अशुद्ध उच्चार शोधण्यासाठी त्याची एकाग्रता वाढीस लावतील. अशा विविध उपक्रमातून निरीक्षण क्षमता विकसित करू शकतो यातून विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञानही वाढते व त्यांचा आत्मविश्वास ही वाढतो. आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे जरुरीचे आहे .काही विद्यार्थी लाजरे असतात त्यांना विश्वासात घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना नकळत प्रवाहात ओढून घेतले पाहिजे. यामुळे त्यांच्यातील कमीपणाची भावना काढून टाकले जाते. The observation ability of students should be enhanced
ससा तो ससा की कापूस जसा हे बालगीत हवायुक्त सादर करताना आत्मविश्वास कमी असणाऱ्या विद्यार्थ्याला ससा करावे तसेच त्याला तू हे फार छान करतोस असाच उभा राहा असे म्हणाल किंवा वा फार सुंदर अशा प्रकारे बोलून त्यांच्यात आवड निर्माण करावी. यामुळे आपण सुद्धा इतरांप्रमाणेच कलागुण सादर करू शकतो अशी भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. कधी कधी वर्गात काही उपक्रम घ्यावेत. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना एखादी वस्तू आणण्यास सांगावी. त्यामुळे त्यांच्यातील भीती आपोआप दूर होते. The observation ability of students should be enhanced
