• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्याला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार

by Guhagar News
December 2, 2024
in Maharashtra
149 2
15
293
SHARES
838
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा

मुंबई, ता. 02 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुतीचे सरकार येत्या ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून दिली. महायुतीचा शपथविधी सोहळा ५ तारखेला आझाद मैदानात संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. The oath ceremony will be held in the presence of Modi

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात २८८ पैकी महायुतीला २३५ जागा मिळाल्या आहेत. भाजपने सर्वाधिक १३२ जागांवर विजय मिळवला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ५७ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागांवर बाजी मारली होती. बावनकुळे यांनी शपथविधीची वेळ आणि तारखी सांगितली असली तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असेल याचे उत्तर मिळालेले नाही. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ३ तारखेला दुपारी १ वाजता होणार आहे. या बैठकीसाठी दिल्लीतून निरीक्षक येणार आहेत. The oath ceremony will be held in the presence of Modi

बैठकीत विधीमंडळातील नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या सोहळ्यात भाजपचे 25 कॅबिनेट मंत्री, शिवसेना 9 कॅबिनेट मंत्री आणि 3 राज्यमंत्री तर राष्ट्रवादी 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री यांचा शपथविधी होईल. यात गृहमंत्रीपद हे भाजपकडे राहणार असल्याचे समजते. The oath ceremony will be held in the presence of Modi

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarThe oath ceremony will be held in the presence of ModiUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.