पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा
गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नवनिवाचित ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे यांचा श्रीविठ्ठल रखुमाईची मुर्ती देवून सत्कार करण्यात आला. The newly elected members met Thackeray
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/01/add-2-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2023/01/add-2-1.jpg)
ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेने तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश संपादन केले. या सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ बंगल्यावर यथोचित गौरव केला. त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाची पराकाष्टा करणाऱ्या तसेच मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सुध्दा विशेष अभिनंदन राज ठाकरे यांनी केले. The newly elected members met Thackeray
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वैभवी विनोद जानवळकर (ग्रा.प. सदस्य,जानवळे), सचिन नारायण जोयशी, विनेश सिताराम तांबे, वर्षा विलास शितप, रजनी रविंद्र कदम (ग्रा.प. सदस्य कौंढर काळसुर) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा श्रीविठ्ठल रखुमाईची मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी राज साहेब ठाकरे यांनी ग्रामपंचायत सदस्यांना मनसे पक्ष घराघरात, गावागावात वाढवुन पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले. यापुढील काळात जोमाने काम करा, मनसे पक्ष सदैव आपल्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले. The newly elected members met Thackeray
यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष सतिश नारकर, जिल्हा अध्यक्ष जितेंद्र चव्हाण, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यय विनोद जानवळकर, सहसंपर्क अध्यक्ष समीर जोयशी सुयोग कुंबटे, सुनिल मूकनाक, सचिन जोयशी, हरीष पेटकर, विशाल जोयशी, विवेक शिकै उपस्थित होते. The newly elected members met Thackeray