गुहागर, ता. 18 : गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पडलेले खड्डे तत्काळ भरून टाका, अन्यथा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आले होते. आगामी गणेशोत्सव लक्षात घेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर गुहागरातील मार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे सिमेंट काँक्रिटने भरण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तत्परतेने लक्ष घातल्याने राष्ट्रवादी शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांनी आभार मानले आहेत. The NCP’s bang filled the pits in Guhagar


गुहागर – विजापूर महामार्गाच्या कामात अनेक ठिकाणी त्रुटी राहिल्या होत्या. आहेत. मार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. रस्ता उंच सखल असल्यामुळे प्रवाशांना, वाहनचालकांना होत असणारा त्रास, मोडकाआगर पुलाजवळील जोड रस्त्याची स्थिती, शृंगारतळी हायस्कूल जवळील धोकादायक रोड, काजळी स्टॉप जवळील अपुर्ण आवश्यक पुल, चिखली येथील अर्धवट असणारे पुलाचे काँक्रिटीकरण, पाटपन्हाळे येथील निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण आणि रस्त्याच्या बाजूला आवश्यक असणाऱ्या पिकप शेड याबाबत संबंधित ठेकेदार व महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस काम होताना दिसत नाही. The NCP’s bang filled the pits in Guhagar


तसेच गुहागर शहर झिरो पॉईंट ते गुहागर शासकीय विश्रामगृह या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्यामुळे अपघातही घडले आहेत. आगामी गणपती सण लक्षात घेता मार्गावर पडलेले खड्डे तत्काळ भरून टाकून प्रवासी व वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्याम खूनेकर यांना देण्यात आले होते. खड्डे बुजवण्यात आल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे. The NCP’s bang filled the pits in Guhagar