विहिरी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेणार : उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल
गुहागर, ता. 20 : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीपुरवठा नियोजनामध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय नगरपंचायत घेणार आहे. पाणी बचतीसाठी सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा कालावधी १० मिनिटांनी कमी करण्यात येणार आहे. तसेच खासगी व सार्वजनिक विहिरी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेणार असल्याचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रदीप बेंडल यांनी सांगितले. The Nagar Panchayat will take the decision to cut water supply
ते म्हणाले, पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने स्वच्छता गाडीवरून ध्वनीक्षेपकाद्वारे संदेश देणे सुरू केले आहे. शहरात नियमितपणे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी उपलब्ध पाणीसाठा मर्यादित आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. मात्र काही नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हा अपव्यय वेळीच टाळावा. वाहन, रस्ता, गटार अथवा सार्वजनिक ठिकाणे धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. पाणी साठवून ठेवताना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वाया जाऊ देऊ नये. पाण्याचा अनधिकृत वापर अथवा अपव्यय आढळल्यास सुजाण नागरिकांनी याबाबत नगरपंचायतीला कळवावे. पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर नगरपंचायतीतर्फे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. The Nagar Panchayat will take the decision to cut water supply
दरम्यान, मोडकाआगर धरण असताना व मुबलक पाणीसाठा असतानाही दुष्काळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नगरपंचायत पाण्याच्या दिलेल्या वेळेमध्ये कपात करू शकते. तसेच खासगी व सार्वजनिक विहिरी यांची पाहणी करून ते पाणी उपयोगात कसे आणता येईल यासाठी निर्णय घेतला जाणार आहे. शहरामध्ये एकूण २३४२ नळजोडण्या केल्या आहे. यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होतो. याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी २१ ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. The Nagar Panchayat will take the decision to cut water supply
