आरे वाकी पिंपळवाट ग्रामपंचायत निवडणुक
गुहागर, ता. 21 : एखाद्या निवडणुकीत एकाच घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुक लढवतात हे ही नवे नाही. परंतु एकाच ग्रामपंचायतीत, एकाच प्रभागात, एकाच प्रवर्गातून एकमेकांच्या विरोधात आई आणि मुलगी उभी होती. अखेर काल मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ७० वर्षीय आईनेच बाजी मारल्याची घटना आरे वाकी पिंपळवाट ग्रामपंचायत निवडणुकीत घडली. या विजयानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले. The mother won the election
गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या गटात आई आणि मुलगी या दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. सुवर्णा दिनानाथ भोसले आणि त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर (सासरचे नांव) अशी या उमेदवारांची नावे आहेत. गावातील दोन वेगवेगळ्या आघाड्यामधुन या मायलेकी एकमेकांच्या विरोधात उभ्या होत्या. The mother won the election
याबाबत ७० वर्षीय सुवर्णा भोसले यांनी आपल्याला तरुण मुलांनी निवडणुकीत उभे रहाण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याच प्रभागात त्यांच्या लेकीने अर्ज भरला. ती यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहीलीहि आहे. त्यामुळे तिने उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असा आग्रह सुवर्णा भोसले यांनी मुलगी प्राजक्ताला केली होती. मात्र, प्राजक्ता हिने आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने याठिकाणी मायलेकिंमध्ये लढत झाली. आणि अखेर या लढतीमध्ये आई सुवर्णा भोसले यांनी बाजी मारत २८२ मते घेतली. तर मुलगी प्राजक्ता देवकर यांना २३२ मते पडली. The mother won the election
दरम्यान, या विजयानंतर सुवर्णा भोसले म्हणाल्या की, मी पहिल्यापासून लोकांसाठी धावत होती. विशेष म्हणजे आ. भास्कर जाधव साहेब व विक्रांत जाधव यांनी आमच्या गावात जी विकासकामे केली. त्या जोरमुळेच आम्हाला विजय मिळवणे सहज सोफे झाले. आरे राम मंदिराकडे येणारा रस्ता हा माझ्या आयुष्यात कधीच झाला नसता. तो रस्ता आ. जाधव साहेबांमुळे झाला. मुली सोबतच्या लढतीविषयी विचारले असता त्यांनी सांगितले, सर्वांनी मला आदीच सांगितले होते मी निवडून येणार. आणि ते झाले. प्रचारा दरम्यान कधीच मुलीच्या विरोधात प्रचार केला नाही. आमच्या पॅनलला मतदान करा, असे मतदारांना आवाहन केले होते. मुलीच्या पराभवाबद्दल छेडले असता, त्या म्हणाल्या की, तिला मी आधीच सांगत होते. तू उभी राहू नको. तू पाच वर्षे ग्रामपंचायतीमध्ये सदस्या होतीस. माझे ७० वय आहे, मला आता उभे राहू दे. शेवटी जे नशिबात असते तेच घडते, असे त्यांनी शेवटी सांगितले. The mother won the election