• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी दिली उद्योजक व शेतकऱ्यांना भेट

by Guhagar News
December 19, 2022
in Ratnagiri
130 1
0
The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs
255
SHARES
728
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 19 : महाराष्ट्र राज्याचे मंत्री, कृषि महाराष्ट्र राज्य, श्री. अब्दुलजी सत्तार, यांची दि. 15/12/2022 रोजी रत्नागिरी तालुक्यातील काजू प्रक्रिया उद्योजक तसेच प्रगतशील श्री शेतकरी ऋषिकेश परांजपे गाव -मिरजोळे यांच्या परांजपे ऍग्रो प्रॉडक्ट्स या काजू कारखाना भेट देण्यात आली.  यावेळी गोळप येथील आंबा फळपिकाचे प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार श्री. रफिक मुकादम यांचीही भेट घेतली. The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

या भेटी दरम्यान मा. कृषी मंत्री यांनी श्री.ऋषिकेश परांजपे यांचेशी हितगुज साधत काजू उत्पादन, काजूगरे स्थानिक, राज्यस्तर बाजार भाव, विविध प्रकारची काजू बी प्रतवारी, काजू बीया पासून तेल निर्मीती प्रक्रिया या विषयावर माहिती  घेतली.  काजू फळ पिकाच्या लागवडीपासून प्रक्रिया व विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन काजू फळ पिकाच्या सर्वकष विकासासाठी महाराष्ट्र शासन तर्फे लागू करण्यात येणाऱ्या काजू फळपीक विकास योजना व त्यासंबंधी आखले जाणारे एक निश्चित धोरण यावर सखोल चर्चा केली.  तसेच काजू उत्पादक शेतकरी, काजू फळपीक उद्योजक यांना येणाऱ्या समस्या व काजू प्रक्रिया उद्योगात निर्माण होणाऱ्या संधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

त्यानंतर दि. 16/12/2022 रोजी सकाळी 10.00 वाजता रोजी श्री.अब्दुलजी सत्तार यांची गोळप येथील आंबा फळपिकाचे प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार श्री.रफिक मुकादम यांच्या आंबा बागेस भेट दिली. उपस्थित शेतकरी यांचेशी कोकणातील शेतीविषयक फलोत्पादन योजना, फळपीक विमा, वन्यप्राणी मुळे होणारे शेतीचे नुकसान यासारख्या विविध समस्यांवर शेतकऱ्याशी चर्चा केली व शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेतल्या.  The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

दि.16 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तृणधान्य वर्ष 2023 राज्यस्तरीय पोस्टर्स व बॅनर्स चे विमोचन करण्यात आले. यावेळी मंत्री, कृषि महाराष्ट्र राज्य, मा.ना.श्री.अब्दुलजी सत्तार, यांच्या हस्ते कृषि विभागाने विविध बचत गट व प्रक्रीयाधारक यांच्या माध्यमातून  तयार केलेल्या नाचणीच्या विविध प्रक्रिया युक्त पदार्थ मान्यवरांना भेट स्वरूपात देण्यात आले. The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

या वेळी उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी व रायगड जिल्हा मा.ना.श्री.उदयजी सामंत, शालेय शिक्षण मंत्री मा.ना. श्री. दीपकजी केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण, बंदरे व खणी कर्म मंत्री, मा.ना.श्री. दादाजी भुसे, मा.आमदार श्री.शेखर निकम, मा.आ. श्री.योगेश दादा कदम, मा.आमदार श्री.अर्जुनजी खोतकर, मा.आमदार श्री.भरतजी गोगावले, मा.आमदार श्री.सदा सरवणकर,माजी खासदार श्री.निलेशजी राणे, माजी मंत्री श्री.नवले, मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी श्री देवेंदर सिंग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. कीर्ती कुमार पूजार, मा.विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभाग ठाणे, श्री.अंकुश माने साहेब, मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी श्रीम. सुनंदा कुऱ्हाडे, मा.उपविभागीय कृषि अधिकारी, रत्नागिरी श्रीम.भाग्यश्री  नाईकनवरे, मा.कृषि विकास अधिकारी जि.प.रत्नागिरी, श्री.अजय शेंडे साहेब, व जिल्ह्य़ातील कृषि विभाग व इतर विभागांचे अधिकारी/कर्मचारी, शेतकरी बंधू , पत्रकार व पदाधिकारी, गोळप व पावस गाव शिवारातील शेतकरी आंबा फळपिकाचे प्रगतशील शेतकरी व आंबा बागायतदार तसेच कृषी विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते. The Minister of Agriculture gave a visit to entrepreneurs

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe Minister of Agriculture gave a visit to entrepreneursUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.