Guhagar News सध्या देशातील जवळपास प्रत्येक राज्यात वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. या वंदे भारत एक्सप्रेसेचे निर्माते आहेत भारतीय रेल्वेमधील अधिकारी सुधांशु मणी. या सुधांशु मणींनी तंत्रज्ञान विकसीत करुन, जगभरातील हाय स्पीड ट्रेनच्या निम्म्या किंमतीमध्ये ही ट्रेन बनवली आहे. याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुधांशु मणींचे कौतूक केले होते. ही 9 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मणी रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. The Man Behind Vande Bharat Express
इंजीनियर असलेल्या सुधांशु मणी यांच्या निवृत्तीला केवळ दोन वर्षे शिल्लक होती. भारतीय रेल्वेमध्ये एक प्रथा आहे की, निवृत्तीच्या आधी संबंधित अधिकाऱ्याला त्याच्या पसंतीच्या ठिकाणी शेवटची बदली केली जाते. त्याप्रमाणे सुधांशु मणींना भारतीय रेल्वेने त्यांना महाव्यवस्थापक म्हणून कुठे बदली हवी असे विचारले होते. त्यावेळी आरामदायी, घराजवळच्या शहरात बदली न मागता सुधांशुजींनी आयसीएफ (Integral Coach Factory) चेन्नई म्हणजे रेल्वेचे डबे बनविण्याच्या कारखान्यात पोस्टींग मागितले. सगळेजण अचंबित झाले. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, चेन्नईला जावून काय करणार आहात. तेव्हा सुधांशु मणी म्हणाले की, स्वदेशी तंत्रज्ञान असलेली भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची माझी इच्छा आहे. The Man Behind Vande Bharat Express
2016 च्या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी भारतामध्ये ताशी 180 किमी गतीने धावणाऱ्या ट्रेन भारतीय रेल्वेत असल्या पाहिजेत असे धोरण आखले. त्या दृष्टीने भारतीय रेल्वेने Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी केली. भारतातील रेल्वे ट्रॅकवर ही चाचणी सफल झाली. मात्र १० डब्यांच्या एका गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये ही कंपनी मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. त्यामुळे Semi High Speed Train च्या प्रकल्पाची गती खुंटली होती. या पार्श्वभुमीवर सुधांशु मणी यांनी आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली Semi High Speed Train बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत. असा संकल्प केला. त्यासाठी आयसीएफ (Integral Coach Factory) चेन्नईची निवड केली. संशोधन आणि विकासासाठी भारतीय रेल्वेकडे 100 कोटी रुपये देण्याची मागणी केली. भारतीय रेल्वेने केंद्र सरकारजवळ बोलून सुधांशु मणींना प्रोत्साहन दिले. The Man Behind Vande Bharat Express
सुधांशू इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई येथे महाव्यवस्थापक (Indian Railway) बनले. 10 डब्यांऐंवजी त्यांनी 18 डब्यांच्या रेल्वेचे डिझाईन केले. Semi High Speed Train बोगीची फ्रेम तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. सुधांशू मणी यांना कानपूरमध्ये एक कंपनी सापडली जी फ्रेम बनवू शकते, त्यांनी या कंपनीचा Integral Coach Factory, Channai सोबत करार केला. दिली. त्यानंतर 50 रेल्वे अभियंते आणि 500 कारखाना कामगारांच्या टीमने अवघ्या 18 महिन्यांत वंदे भारतचा प्रोटोटाइप रॅक डिझाइन आणि तयार करण्यासाठी सतत काम केले. भारतात धावणाऱ्या कोणत्याही रेल्वेच्या बोगीला स्वतंत्र इंजिन नाही. The Man Behind Vande Bharat Express
सुरवातीला असणारे मोठे इंजिन 18 ते 22 डब्यांना ओढते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसच्या रचनेत वेगवान प्रवेगासाठी प्रत्येक बोगीखाली इंजिन बसवण्याचा निर्णय सुधांशु मणींनी घेतला. हेया गा डीचे वैशिष्ट्य हे आहे. या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही स्वतंत्र इंजिनाची गरज नाही. या ट्रेनचा प्रत्येक डबा स्वतःच 'सेल्फ प्रोपेल्ड' आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे. गांधीनगर-मुंबई दरम्यानच्या ट्रायलदरम्यान भारतीय बनावटीच्या Vande Bharat Express या Semi High Speed Train ने बुलेट ट्रेनपेक्षाही ५२ सेकंद आधी पोचून बाजी मारली. चाचण्यांच्या काळात या ट्रेनला ट्रेन-18 म्हणून संबोधले जात होते. अवघ्या 18 महिन्याच्या कालावधीत सुधांशु मणी यांच्या नेतृत्त्वात Integral Coach Factory, Channai मध्ये काम करणाऱ्या 50 अभियंते आणि 500 महिला व पुरुष कामगांरांच्या अथक परिश्रमांना यश मिळाले. या ट्रेनचे उत्पादन मुल्य आहे केवळ 97 कोटी रुपये. 10 डब्यांच्या एका सेमी हायस्पीड विदेशी ट्रेनसाठी भारतील रेल्वेला 250 कोटी रुपये खर्च करावे लागणार होते. शिवाय तंत्रज्ञानही मिळणार नव्हते. त्याठिकाणी भारतीय रेल्वेचे अधिकारी सुधांशु मणी यांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसीत करतानाच भारताचे 153 कोटी रुपयेही वाचवले. पुढे याच ट्रेनचे नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले. The Man Behind Vande Bharat Express
दोन वर्षात तयार झालेली पहिली वन्दे भारत ट्रेन वाराणसी ते नवी दिल्ली धावली. इंजिनशिवाय सेमी-हाय स्पीड ट्रेन चालवण्याचे सुधांशू मणी यांचे स्वप्न अखेर Vand Bharat Express सुरू झाल्याने पूर्ण झाले. भारताच्या रेल्वेच्या विकासातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. भारतातील पहिली स्वदेशी अर्ध-हाय-स्पीड ट्रेन (Semi High Speed Train) नागरिकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या यशस्वी संचालनाचे स्वागत करताना, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे निर्माते आणि Sudhanshu Mani म्हणाले की, ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या आकांक्षेचे आणि पुनरुत्थानशील भारताचे प्रतीक आहे. या गाड्यांच्या निर्मिती आणि उत्पादनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील ' मेक इन इंडिया' मोहिमेला चालना मिळाली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या निर्मितीने भारताच्या स्वावलंबी प्रवासाला गती दिली आहे. अनेक देशांतील रेल्वे अधिकारी कमी खर्चातील सेमी हायस्पीड ट्रेनच्या निर्मितीने अचंबित झाले आहेत. सुधांशु मणी यांची मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा. https://m.rediff.com/business/interview/the-man-behind-vande-bharat-express/20190219.htm