दोन महिने कोकणात होतं वास्तव्य, निवासाबाबत उत्सुकता
मयूरेश पाटणकर
गुहागर, 07 : प्रजोत्पादनासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या कासवांनी आता दक्षिणेकडे धाव घेतल्याचे संकेत मिळत आहेत. हा प्रवास आता नेमका कुठे जाऊन थांबतो. त्यांचा निवास कोणत्या भागात असतो. यासाठी अजून काही काळ वाट पहावी लागेल. असे मत ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करणारे संशोधक डॉ. सुरेशकुमार यांनी व्यक्त केले. The journey of turtles with transmitters
फेब्रुवारी महिन्यात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून सोडलेल्या बागेश्री आणि गुहा या दोन कासवांचा प्रवास गेले 15 दिवस दक्षिणेकडे सुरु आहे. 22 फेब्रुवारीला कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग आणि वन्यजीव संस्था या तिन संस्थांद्वारे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या दोन मादी कासवांना सॅटेलाईटन ट्रान्समिटर लावून समुद्रात सोडण्यात आले होते. बागेश्री आणि गुहा अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. 22 फेब्रुवारीपासून या दोन्ही कासवांनी आपला प्रवास उत्तरकडे गुजराथच्या दिशेने सुरू ठेवला. 25 दिवसांच्या या प्रवासात बागेश्री रायगड जिल्ह्यातील नांदगाव किनारपट्टीपर्यंत पोचून पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करती झाली. तर गुहा हरिहरेश्र्वर पर्यत जावून परत गुहागर येथे खोल समुद्रात विहार करत होती. 30 मार्चला मिळालेल्या छायाचित्राप्रमाणे बागेश्री सिंधुदूर्गातील मालवण ते तारकर्ली भागात आहे. तर गुहागर देवगड जवळ समुद्रात आढळून येत आहे. The journey of turtles with transmitters
या माहितीच्या आधारे काही निष्कर्षाप्रत संशोधक आले आहेत. याबाबत बोलताना डॉ. सुरेशकुमार म्हणाले की, पश्चिम किनारपट्टी भागातील ऑलिव्ह रिडले कासवे नोव्हेंबर-डिसेंबर ते मार्च – एप्रिल या विणीच्या हंगामात अंडी देण्यासाठी कोकणात येतात. एकेकाळी वेळासचा समुद्रकिनाऱ्यावर सर्वाधिक कासवे अंडी देण्यासाठी येत असतं. आता गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याला कासवांनी पसंती दिली आहे. The journey of turtles with transmitters
गेल्यावर्षी (2022 मध्ये) वेळास (1), आंजर्ले (1) आणि गुहागर (3) अशा 5 कासवांना तर 2023 मध्ये गुहागरमध्ये 2 कासवांना सॅटेलाईट टॅगिंग करुन समुद्रात सोडले होते. या सर्वांच्या प्रवासाच्या नोंदी आपल्याकडे आहे. त्यावरुन असे दिसते की साधारणपणे नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत सर्वच मादी ऑलिव्ह रिडले या कोकणातील समुद्रात रेंगाळताना दिसतात. यावेळी त्यांचा प्रवास गुजरातपर्यंत होतो. मात्र एप्रिलनंतर सर्व कासवांचा प्रवास दक्षिणेकडे सुरु होतो. The journey of turtles with transmitters
आता पावसाच्या हंगामात ही कासवे एकाच ठिकाणी विसावा घेतात का, त्यांचे विसाव्याचे ठिकाण पश्चिम किनारपट्टी आहे की, पश्चिमेकडील बेटांलगत त्यांचे वास्तव्य असते. हे विसाव्याचे ठिकाणी ही समुहाने रहातात की स्वतंत्रपणे रहातात. विसाव्याचे ठिकाण एक नसेल तर कोणत्या भागात त्यांचा सर्वाधिक काळ वावर असतो. अशा अनेक प्रश्र्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत. त्यासाठी सॅटेलाईट ट्रान्समिटरने आपल्याला सिग्नल पाठवत रहाणे आवश्यक आहे. The journey of turtles with transmitters