• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निवडणूक निरिक्षकांनी घेतला शिक्षक संघाचा आढावा

by Mayuresh Patnakar
January 27, 2023
in Ratnagiri
84 1
0
The inspectors reviewed the constituency
166
SHARES
474
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 27 :  इव्हीएम द्वारे होणाऱ्या निवडणूकांची यंत्रणांना सवय आहे तथापि शिक्षक संघातील निवडणूक कामकाज सर्व नियम व शिस्त पाळून करा, अशा सूचना कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निरिक्षक विशाल सोलंकी यांनी दिल्या. The inspectors reviewed the constituency

निवडणूक बाबत करण्यात आलेले नियोजन आणि तयारी याचा आढावा विशाल सोलंकी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेतला. शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत आतापर्यंत झालेले कामकाज तसेच प्रत्यक्ष मतदान दिनाची तयारी, मतदान केंद्राचे नियोजन, वाहतूक व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सादरीकरण केले. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या निवडणुकीत लागणाऱ्या बंदोबस्ताबाबत माहिती दिली. The inspectors reviewed the constituency

कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हयात 17 मतदार केंद्र असतील. जिल्हयातील शिक्षक मतदारांची संख्या 4120 आहे. मतमोजणी विभागीय स्तरावर एकत्र होईल. या मतदार संघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदूर्ग जिल्हयातील मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. The inspectors reviewed the constituency

या बैठकीस अपर जिल्हाधिकारी (प्र.) शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, प्रांतधिकारी विकास सुर्यवंशी, तहसिलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होते. इतर ठिकाणचे सर्व प्रांत तसेच तहसिलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. The inspectors reviewed the constituency

तालुका निहाय मतदान केंद्राची संख्या

मंडणगड -1, दापोली-1, खेड-1, चिपळूण- 4, गुहागर-1, संगमेश्वर-3, रत्नागिरी-2, लांजा-1 आणि राजापूर-3. जिल्हयात एकूण 4120 मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 2742 असून स्त्री मतदार संख्या 1378 आहे. The inspectors reviewed the constituency

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarThe inspectors reviewed the constituencyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share66SendTweet42
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.