गुहागरातील चिंद्रवळे सलपेवाडीने घेतला क्रांतिकारी निर्णय
गुहागर, ता. 26 : पूर्वीपार परंपरेच्या नावाखाली ज्या परंपरा चालू होत्या त्याला छेद देण्याचे पहिले पाऊल गुहागर तालुक्यातील चिंद्रवळे सलपेवाडीतील महिलेने उचलले आहे. मुलीने आपल्या मयत झालेल्या आईला अग्नी दिला आहे. या धाडसाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. The girl gave fire to her mother

गुहागर चिंद्रवळे, सलपेवाडी येथील कै. रुक्मिणी पांडुरंग डावल यांचे २४ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुलीच आहेत. त्यामुळे अंत्यविधी कसे करावेत असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी तिथे उपस्थित असणारे ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेचे माजी सरपंच बबनजी ठीक व वाडीतील सर्व वडीलधारी, जाणकार व महिला यांनी चर्चा करून त्यांच्या मुलीने म्हणजेच सौ. पार्वती अनंत देऊळे यांनी अंत्यविधीचे कार्य पार पाडावे असे ठरविले. ग्रामस्थांनी तशी प्रत्यक्ष कृती सुद्धा केली. The girl gave fire to her mother

लोक नींदेला न जुमानता चिंद्रवळे सलपेवाडी येथे मुलीने आपल्या मयत झालेल्या आईचे अंत्यविधीचे कार्य पार पाडून अग्नी दिला. गाव-पंचक्रोशीतील ही पहिलीच घटना आहे. गावातील ग्रामस्थांनी उचललेलं हे क्रांतिकारी पाऊल आहे. The girl gave fire to her mother
