गुहागर, ता.06 : महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग (Marathi Language Department, Government of Maharashtra), राज्य मराठी विकास संस्था आणि MAAP EPIC Communication Pvt. Ltd यांच्या संयुक्त विद्यमाने लो. टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेवटचे 5 दिवस शिल्लक आहेत. ही स्पर्धा online आणि offline (शाळा पातळीवर) दोन्ही पद्धतीने शाळा / जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार आहे. आणि ती सर्वांसाठी खुली आहे. तरी गणित या विषयाची आवड असणाऱ्या आणि १ ते १०० अंक उच्चार, ११ ते २० पाढे आणि २१ ते ३० पाढे, पावकी आणि निमकी, पाऊणकी आणि सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे तोंड पाठ असणाऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आव्हान करण्यात आले आहे. The Fundamentals of Mathematics

विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणार्या “अंकनाद – गणिताची सात्मीकरण प्रणाली” तर्फे सादर करत आहोत. राज्यव्यापी पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा. आतापर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर online पद्धतीने ही स्पर्धा आयोजिली जात होती. राज्यात सर्व शाळा सुव्यवस्थितपणे सुरु झाल्याने ही स्पर्धा online आणि offline (शाळा पातळीवर) दोन्ही पद्धतीने शाळा / जिल्हा आणि राज्य पातळीवर आयोजित करण्यात येणार आहे. आणि ती सर्वांसाठी खुली आहे. online स्पर्धांसाठी नेहमीप्रमाणे ६ गट असतील. offline (शाळा पातळीवर) स्पर्धांसाठी ५ गट असतील. खुल्या गटातील स्पर्धकांनी online स्पर्धेतच सहभागी व्हायचे आहे. सहभागी होण्यासाठी अंकनाद अॅप्लिकेशन मधील लिंकवरील फॉर्म भरुन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेची नियमावली पूर्ण वाचून त्याचे पालन करणे गरजेचे आहे. The Fundamentals of Mathematics
स्पर्धेसाठी गटानुसार अभ्यासक्रम
- बालगट आणि पहिली – १ ते १०० अंक उच्चार
- दुसरी आणि तिसरी – १ त १० आणि ११ ते २० पाढे
- तिसरी – १ ते १०, ११ ते २० पाढे आणि २१ ते ३० पाढे
- चौथी आणि पाचवी – पावकी आणि निमकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे)
- सहावी आणि सातवी – पाऊणकी आणि सव्वायकी (दोन्ही पाढे १०० पर्यंत म्हणावे)
- आठवी, नववी आणि दहावी – दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे)
- खुला गट आणि शासकीय कर्मचारी गट – पाऊणकी, सव्वायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि एकोत्रे (किमान तीन पाढे १०० पर्यंत म्हणावे)

विशेष सूचना
स्पर्धेत मराठी पाढेच ग्राह्य धरले जातील. स्पर्धकांनी अन्य भाषेत पाढे म्हणू नये.
महत्वाची सूचना
मागील स्पर्धेतील विजेत्याला त्याच गटात पुन्हा सहभागी होता येणार नाही. त्यांना पुढच्या गटातून सहभाग घेण्याची मुभा आहे. मात्र खुल्या गटातील विजेत्यांना पुन्हा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. The Fundamentals of Mathematics
नोंदणी विषयक महत्वाच्या सूचना
नोंदणी अंकनाद app मधूनच होणार आहे. गुगल प्ले स्टोअर मधून अंकनाद app डाउनलोड करावे. User Registration पूर्ण केल्यावर app सुरु होईल. समोरच पाढे पाठांतर नोंदणीची लिंक असेल. तिथे क्लिक करून online की offline पर्याय निवडावा. आणि जो पर्याय निवडला आहे त्याची नियमावली काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर स्पर्धक आणि पालकांची माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच स्पर्धकांनी दिलेल्या मेल आयडीवर व्हिडीओ अपलोड करण्याची लिंक आणि *स्पर्धकाचा नोंदणी क्रमांक (Unique Code) पाठवला जातो. The Fundamentals of Mathematics
त्या नंतरच्या टप्प्यात online स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी ठरवून दिलेल्या तारखेच्या आत आपल्या अभ्यासक्रमानुसार पाढ्यांची तयारी करून व्हिडीओ तयार करायचा आहे. आणि तो दिलेल्या लिंकवर अपलोड करायचा आहे. मात्र offline स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांची पहिली फेरी त्यांच्या शाळेतच होईल. त्यांनी त्यांच्या अभ्यासक्रमानुसार पाढ्यांची तयारी करून शाळेतच सादरीकरण करायचे आहे. त्याच शाळेतील शिक्षक प्रत्येक गटातील (कमीतकमी २० अधिकाधिक कितीही) स्पर्धकांमधून ४ स्पर्धकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करतील. The Fundamentals of Mathematics

Online आणि offline दोन्ही स्पर्धांचे एकत्रीकरण राज्यस्तरीय मुल्यांकनात होणार आहे. शाळेतून निवडलेले स्पर्धक आणि online स्पर्धेतून निवडलेले स्पर्धक मिळून राज्यस्तरीय मूल्यांकनाला सामोरे जातील आणि त्या नंतर प्रत्येक गटातून विजयी स्पर्धक निवडले जातील.
प्रथम विजेत्याला ११०००/-, द्वितीय विजेत्याला ७०००/-, त्रितीय विजेत्याला ५०००/- चे भारतीय डाक विभागाचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिली जातील. उत्तेजनार्थ, राज्यस्तरीय निवड झाल्याचे आणि स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रशस्तिपत्र प्रत्येक स्पर्धकाला दिले जाईल. यावेळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्याप्रमाणात करण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. त्या प्रमाणे पुढील सूचना दिल्या जातील. The Fundamentals of Mathematics
“स्पर्धेच्या यशाची गुरुकिल्ली अंकनाद app” (संदर्भासाठी अंकनाद app मध्ये अपूर्णांकांचे पाढे उपलब्ध आहेत.)
Maap EPIC Communication Pvt. Ltd. Phone No. 8767886606, 9860441619, 7276684072
