गुहागर, ता. 12 : राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर ते गुहागर बाजारपेठ मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. याबाबत गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे भरण्यास सांगितले होते. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाने रविवारपासून मोडकाघर ते गुहागर बाजारपेठ मार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. The filling of potholes started at the behest of MNS
या रस्त्यावर पडलेले मोठ मोठे खड्डे धोकादायक बनले होते. याबाबत अनेक वाहन चालक व नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्याकडे या संदर्भात आवाज उठवावा, अशी विनंती केली होती. त्यांनी लगेच राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार व अधिकारी यांना भेटून सदर रस्त्यावरील खड्डे तात्काळ भरावे अशी सूचना केली. त्यानुसार मनसेने केलेली सूचना लक्षात घेऊन रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या कामगारांकडून रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावरील खड्डे भरतेवेळी गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, उपशहर अध्यक्ष राजेश कदम उपस्थित होते. यासंदर्भात नागरिकांनी मनसेचे आभार मानले आहेत. The filling of potholes started at the behest of MNS