• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कार्यकर्त्यांचा विश्र्वास सार्थ ठरला

by Mayuresh Patnakar
May 12, 2023
in Politics
101 1
0
Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

शिवसेना तालुका सचिव पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करताना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, सोबत महिला जिल्हा संघटक रश्मी गोखले, उप जिल्हाप्रमुख प्रभाकर शिर्के, तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर

198
SHARES
566
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन

गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी  दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified

Padve villagers with Shiv Sena party

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई कदम रत्नागिरी जिल्ह्यातील आमचे स्फुती॔ स्थान कीरणजी सामंत साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, जबाबदारीने कार्य करणाऱ्या गुहागर तालुक्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. The faith of Shiv Sena workers was justified

Various programs on Kiran Samant birthday

गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्त्वातील बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेत येणे ही सोपी गोष्ट नव्हती. तरीही अनेक जणांनी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना नेते रामदासभाई कदम, किरण तथा भैय्या सांमत यांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी पदांची जबाबदारी उचलली. माध्यमांमधुन टिकाटिप्पणी सुरु होती. न्यायालयाकडून निर्णय येणे बाकी होते. स्थानिक ठिकाणीही दबाव होताच. या सर्व परिस्थितीतही खंबीरपणे पक्ष वाढविण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी काम करत आहेत. आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या सर्व कार्यकर्त्यांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. The faith of Shiv Sena workers was justified

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarShiv SenaThe faith of Shiv Sena workers was justifiedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share79SendTweet50
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.