गुहागर, ता. 17 : राजकारणात एकाच घरात दोन, तीन पक्षांचे पदाधिकारी पहायला मिळणे हे आता नवीन राहीलेले नाही. एखाद्या निवडणुकीत एकाच घरातील दोन सदस्य वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणुक लढवतात हे ही नवे नाही. परंतु एकाच ग्रामपंचायतीत, एकाच प्रभागात, एकाच प्रवर्गातून एकमेकांच्या विरोधात आई आणि मुलगी उभी आहेत. त्यामुळे या गावात सध्या सरपंच कोण याबरोबरच आई कि मुलगी जिंकणार कोण अशीही चर्चा सुरु आहे. The election will be fought in Mileki
गुहागर तालुक्यातील आरे वाकी पिंपळवट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग १ मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या गटात आई आणि मुलगी या दोनच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुवर्णा दिनानाथ भोसले आणि त्यांची मुलगी प्राजक्ता प्रसाद देवकर (सासरचे नांव) अशी या उमेदवारांची नावे आहेत. गावातील दोन वेगवेगळ्या आघाड्यामधुन या मायलेकी एकमेकांच्या विरोधात उभ्या आहेत. The election will be fought in Mileki
याबाबत बोलताना 70 वर्षीय सुवर्णा भोसले म्हणाल्या की, ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मंदिरात झालेल्या बैठकीत काही तरुण मुलांनी मला उभे रहाण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरुन आले. त्यावेळी या प्रभागातून अन्य कोणीच अर्ज भरला नव्हता. नंतर माझ्या लेकीने अर्ज भरला. ती यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहीली आहे. म्हणून तीला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. काही नातेवाईकांनीही विनंती केली. मात्र ती निवडणुक लढविण्यावर ठाम राहीली. आता निवडणूक असल्याने मी देखील 70 व्या वर्षी प्रचारात उतरले आहे. The election will be fought in Mileki
सुवर्णा भोसले यांची लेक प्राजक्ता देवकर म्हणाल्या की, प्रचार करताना मी कुठेही आईच्या विरोधात काहीही बोलत नाही. 7 वर्ष ग्रामपंचायतीचा कारभार जवळून पाहीला आहे. या अनुभवाच्या बळावर गाव पॅनेलने मला उमेदवारी दिली आहे. निवडून येण्यासाठी सर्वांचे सहकार्य, मतरुपी आशिर्वाद हवे आहेत. असा प्रचार मी करत आहे. The election will be fought in Mileki
या प्रवर्गात केवळ याच दोघी उमेदवार असल्याने दोघींपैकी एक जिंकणार हे निश्चित आहे. दोघींपैकी कोण जिंकणार. अनुभवी मुलगी आईवर मात करणार की मातेच्या पदरात विजयाचे माप जनता टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. The election will be fought in Mileki