रत्नागिरी, ता. 11 : ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तरूणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आली. या पदार्थाचे वजन १२.१८ ग्रॅम इतके आहे. पोलिसांनी मोहसिन अब्दुल गणी शेख (२६, रा. चर्च रोड, मच्छीमार्केट, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आहे. The drug smuggler was detained by the police


रत्नागिरी शहर पोलिस स्थानक गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक आकाश साळुंखे व पोलिस अंमलदारांनी ही कारवाई केली. रत्नागिरी शहर परिसरातील भागामध्ये पोलिसांची गस्त सुरू होती. या गस्तीदरम्यान रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म १ वरुन पार्सल गेटने पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोहसिन सॅक लावून संशयास्पदरित्या उभा होता. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात पाच पारदर्शक प्लास्टिक पिशव्या मिळाल्या. त्यामध्ये ४५० टर्की पावडर असलेल्या कागदी पुड्या होत्या. अमली पदार्थाची प्राथमिक तपासणी केली असता त्यामध्ये ब्राऊन हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले आहे. The drug smuggler was detained by the police
मोहसिन अब्दुल गणी शेख याच्यावर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस हे. काँ. प्रसाद घोसाळे, गणेश सावंत, प्रवीण बर्गे, अमोल भोसले, आशिष भालेकर, विनय मनवल, रत्नकांत शिंदे यांनी केली. The drug smuggler was detained by the police