रत्नागिरी, ता. 21 : एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी नाशिक येथील अस्तित्व मल्टी सर्व्हीसेस या खाजगी कंपनीकडून रत्नागिरी विभागात कार्यरत असणाऱ्या 150 चालकांनी आपल्या विविध समस्या निवारण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांची रत्नागिरी येथे भेट घेतली. The drivers met Samant
रत्नागिरी विभागातील विविध आगारात कार्यरत असणाऱ्या या चालकांच्या सेवेची मुदत 16 जुन रोजी संपली होती. ती 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली. मात्र त्यानंतर या चालकांवर पुन्हा बेकारीची कुऱ्हाड येणार असल्याने सर्वांना एस टी सेवेत सामावून घेण्याची मागणी या चालकांनी केली. सदर चालकांना 23900/- इतका पगार मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र 14500/- इतकाच पगार हाती पडत आहे. इतर कोणतेही लाभ या चालकांना देण्यात येत नसल्याने उर्वरीत पैसे हे ठेकेदाराकडे जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. त्यामुळे एस टी कडूनच पगार खात्यावर जमा करावा. अशी मागणी त्यांनी ना. सामंत यांच्याकडे केली. The drivers met Samant
त्याचप्रमाणे खाजगी चालक ड्युटी संपल्यानंतर घरी ये-जा करत असताना वाहक तिकिट आकारण्यात येते. आधीच कमी पगार असल्याने त्यात हा भुर्दंड यामुळे खाजगी चालक यांना घर ते कामाचे ठिकाणापर्यंत ये-जा करण्यास पास देण्यात यावे. तर काम करत असताना एखादा अपघात घडून दुखापत झाल्यास महामंडळाचे अधिकारी आणि ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या चालकांनी केला आहे. The drivers met Samant
यावेळी विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधीक्षक आणि रत्नागिरी विभागातील बहूसंख्य खाजगी चालक उपस्थित होते.