• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जैतापकरांच्या माघारी मागचे नाट्य

by Mayuresh Patnakar
November 5, 2024
in Politics
473 5
0
The drama behind Jaitapkar's retreat

निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या समवेत संतोष जैतापकर

929
SHARES
2.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या संतोष जैतापकरांना अखेरच्या क्षणी माजी खासदार निलेश राणेंनीच हुलकावणी दिली. सल्लामसलत करण्यासाठी कणकवलीत गेलेल्या संतोष जैतापकरांना खास हेलिकॉप्टरची सैर घडवून गुहागरात पाठवले. त्यानंतर जैतापकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. The drama behind Jaitapkar’s retreat

भाजपचे ओबीसी सेलच्या  जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी केलेल्या शक्तीप्रदर्शनामुळे संतोष जैतापकर महायुतीसाठी अडचणीचे ठरु शकतात असे समोर आले. तेव्हापासून भाजपचे पदाधिकारी संतोष जैतापकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रत्येकवेळी जैतापकर अर्ज मागे घेणार असल्याचे ठामपणे सांगत होते. जिल्हाध्यक्ष केदार साठे जैतापकरांच्या भेटीला लक्ष्मी पूजनाचे दिवशी गुहागरला आले परंतू जैतापकर लक्ष्मी पूजनासाठी मुंबईत निघुन गेले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलणेही बंद केले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही  ते नॉट रिचेबल झाले होते. The drama behind Jaitapkar’s retreat

संतोष जैतापकर यांनी याच दरम्याम माजी खासदार व कुडाळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांची भेट पक्की केली. राणेंनी देखील आज त्यांना भेटण्यासाठी सिंधुदूर्गात बोलावले. गेले चार दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या संतोष जैतापकर यांच्यासाठी ही शेवटची हुलकावणी ठरली. सिंधुदूर्गात पोचल्यावर निलेश राणेंनी त्यांना समजावले आणि हेलिकॉप्टरमधुन गुहागरला पाठवून दिले. दरम्यान निलेश राणेंनीच ही माहिती जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना दिली. आणि सर्वांनीच सुटकेचा श्र्वास सोडला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ अर्धातास शिल्लक असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरजीपीपीएलच्या हेलीपॅडवरुन जैतापकरांना गुहागरला निवडणुक कार्यालयापर्यंत आणले आणि उमेदवारी मार्ग घेण्याच्या अर्जावर संतोष जैतापकरांनी सही केली. The drama behind Jaitapkar’s retreat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMLA Bhaskar JadhavMNSNews in GuhagarShiv SenaThe drama behind Jaitapkar's retreatUpdates of GuhagarVikrant Jadhavआमदार भास्कर जाधवगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनालोकल न्युजविक्रांत जाधवशिवसेना
Share372SendTweet232
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.