दिपक कनगुटकर यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
गुहागर, ता. 22 : गुहागर नगरपंचायतीमधील सहा नगरसेविकांनी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि भैय्या सामंत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर देखील उपस्थित होते. त्यामुळे या भेटीचे नेमके कारण काय याची चर्चा सध्या सुरु आहे. The corporators of Guhagar met Samant brothers
गुहागर नगरपंचायतीमधील बांधकाम सभापती सौ. वैशाली मालप, सौ. स्नेहा सांगळे, सौ. मनाली सांगळे या तीन शहर विकास आघाडीच्या नगरसेविका, भाजपच्या सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, सौ. मृणाल गोयथळे आणि नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. स्नेहा भागडे यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारीला) शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांच्या समवेत रत्नागिरीत गेल्या होत्या. तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यानंतर शिर्के हायस्कुलजवळील सामंत कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात जावून या भैय्या सामंत याचीही भेट घेतली. The corporators of Guhagar met Samant brothers
या भेटीबाबत विचारणा केली असता पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागर नगरपंचायतीला 2 कोटींचा निधी त्यामुळे धन्यवाद देण्यासाठी मंत्री सामंत यांची भेट घेतली. विकास निधी मागायला गेलो होतो. सदिच्छा भेट होती. अशी विविध कारणे सांगण्यात आली. मात्र भैय्या सामंत यांच्या भेटीबाबत काहीशी गुप्तताच बाळगण्यात आली होती. The corporators of Guhagar met Samant brothers
गुहागर नगरपंचायतीचा कार्यकाल संपण्यासाठी अवघे दोन महीने आहेत. अशावेळी गुहागरच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुहागर शहराचा पुढील दोन महिन्यात झपाट्याने विकास होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. The corporators of Guhagar met Samant brothers
तर दुसरीकडे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखाची उपस्थिती आणि भैय्या सामंत यांच्या भेटीमुळे शहर विकास आघाडीबरोबरच राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेविकांना शिवसेनेत घेण्यासाठी हा दौरा असण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील अनेक मंडळी भेटतात पण गेल्या काही महिन्यात भैया सामंत याची भेट म्हणजे शिंदे गटात प्रवेश अशी ओळख झाली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) गुहागर शहरातील बळ वाढविण्यासाठी तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी ही भेट घडवून आणल्याची चर्चा आहे. The corporators of Guhagar met Samant brothers