पगार व गेट पास देणार; अधिकाऱ्यांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आश्वासन
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील अँकर सिक्युरिटी सर्व्हिस या ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा १ जुन पासुन पगार व गेटपास बंद केला होता. याबाबत सर्व कामगारानी मनसे पदाधिकाऱ्यांकडे आपले म्हणणे मांडले असता या पदाधिकाऱ्यांनी येथील अधिकाऱ्यांना जाब विचारताच कामगारांच्या दोन्ही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. The contract workers in the RGPPL company got justice

अँकर सिक्युरिटी सर्व्हिस मध्ये सर्व कामगार काम करत आहेत. जून २०२३ पासून या ठेकेदाराने पगार तसेच गेटपास दिला नसून सदर कॉन्ट्रक्टर कंपनी साइटवर येत नसुन त्यामुळे गेटपास तयार होत नाही आहेत. त्याची जबाबदारी कंपनीच्या अधिकाऱ्यानी घेतली असून दिड महिना झाला असून गेटपास अजुन बनविण्यात आले नाही व पगारही देण्यात आला नाही. वेळोवेळी कामगारांनी विचारले असता काही ना काही कारण सांगून वेळ मारून नेली जाते. पगार व गेटपासची लेखी हमी मागितली असता कोणच देत नाहीत म्हणून सर्व कामगारांनी १५ जुलैच्या दुपारपासून कामबंद केले आहे. कामगारांची कैफियत ऐकून घेतल्यानंतर लगेचच मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी कंपनी व्यवस्थापनाकडे चर्चा केली. कामगारांचे म्हणणे कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. The contract workers in the RGPPL company got justice

यावेळी बोलताना सुनील हळदणकर यांनी सांगितले की, आरजीपीएल कंपनीतील ठेकेदाराने कामगारांचा पगार व गेटपास न दिल्यामुळे कामगारांनी काम बंद केले आहे. आरजीपीपीएल कंपनीचे अधिकारी यांच्याकडे कामगारांचे असलेले प्रश्न मांडण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्याची हमी दिली आहे. सदरचा ठेकेदार हा ठेका सोडून पळून गेला आहे. दुसऱ्या ठेकेदाराची नियुक्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कामगारांचा पगार व गेट पास देण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु जोपर्यंत नवीन कॉन्टॅक्टर मिळत नाही, तोपर्यंत आरजीपीपीएल कंपनीने स्वतः कामगारांच्या पगाराची जबाबदारी घेतली आहे. आज तात्पुरत्या स्वरूपात कामगारांचा प्रश्न सुटला आहे. यापुढे कामगारांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव राहील असा विश्वास सुनील हळदणकर यांनी शेवटी व्यक्त केला. The contract workers in the RGPPL company got justice
यावेळी तालुका सचिव श्रीराम विचारे, गुहागर शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, पालशेत शाखा अध्यक्ष विघ्नेश भायनाक उपस्थित होते. The contract workers in the RGPPL company got justice
