अखिल भारतीय पंचायत कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे
गुहागर, ता. 27 : नव्याने लागू झालेला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा कायदा ग्राहकांचे होणारे आर्थिक शोषण, फसवणूक, विविध समस्या सोडविणे, ग्राहकांचे हक्क मिळवून देणे यासाठी एक शस्त्र आहे. त्याचा अभ्यास करून योग्य विनियोग करून ग्राहकांनी नेहमी जागृत राहून स्वतःसाठी आणि समाजातील समस्याग्रस्त ग्राहकांसाठी उपयोग केला पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष श्री. चंद्रकांत झगडे यांनी केले. The Consumer Protection Act
गुहागर तहसील कार्यालय व अखिल भारतीय पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसिल कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन नायब तहसीलदार श्री. प्रभुदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुरवठा अधिकारी श्री. सावर्डेकर, गुहागर हायस्कुलचे उपमुख्याध्यापक व ग्राहक पंचायत जेष्ठ कार्यकर्ते श्री. सुधाकर कांबळे, रास्त धान्य दुकान संघटनेचे श्री. आग्रे, महावितरणचे श्री. निमकर, श्री. आखाडे, चंद्रभागा गॅस एजन्सीचे श्री. हळदणकर, विविध विभागाचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. The Consumer Protection Act

प्रमुख वक्ते श्री चंद्रकांत झगडे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्याचे प्रयोजन विषद करून ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि नव्याने लागू झालेला ग्राहक संरक्षण कायदा २०१९ यातील महत्वाचे नवीन बदल सांगितले. गेली ४८ वर्ष ग्राहक पंचायत ग्राहक जागृतीसाठी संपूर्ण देशभर सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे. देशातील ग्राहक क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संघटना असून लाखो कार्यकर्ते निःस्वार्थपणे राष्ट्रहित लक्षात घेऊन सातत्यपूर्ण कार्य करत आहेत. The Consumer Protection Act

ग्राहक जागृतीसाठी घ्यावयाची दक्षता यामध्ये भडक जाहिराती, सेल यापासून दूर राहून वस्तू खरेदी करताना योग्य पावती घेणे, गॅरेंटी, वारेंटी कार्ड घेणे, वजन, गुण वत्ता, मॅन्युफॅक्चरींग डेट, एक्सपायरी डेट, एमआरपी इ. बाबी तपासून घेणे आवश्यक आहे. तसेच विविध सेवा दर्जेदार मिळण्यासाठी ग्राहकाने आग्रह धरला पाहिजे. यातून आपणास काही समस्या निर्माण झाल्यास आपण संघटनेकडे संपर्क करू शकता. ग्राहक म्हणून आपल्या न्याय्य हक्कांसाठी सामाजिक कार्यासाठी आपण ग्राहक चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री . झगडे यांनी केले. The Consumer Protection Act

ग्राहक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या ग्राहक म्हणून असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. The Consumer Protection Act

