• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपंग महिलेच्या घराचे बांधकाम जमीनदोस्त

by Ganesh Dhanawade
September 15, 2023
in Guhagar
152 1
0
The construction of the disabled woman's house collapsed
298
SHARES
852
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वरवेली आगरेवाडी येथील घटना

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी येथील रहिवाशी रविंद्र रामचंद्र आगरे व त्यांच्या अपंग पत्नी मंजिरी आगरे यांना प्रधान मंत्री आवास योजनेतून घर मंजूर झाले आहे. या घरासाठी रवींद्र आगरे यांना सहहिस्सेदार परवानगी देत नव्हते, अखेर घर मंजूर असल्याने व स्वतः बेघर असल्याने नाईलाजास्तव वडिलोपार्जित जमिनीतील हिस्स्यामध्ये घराचे बांधकाम सुरू केले. परंतू मंजूर झालेल्या या घराचे बांधकाम सुरु असताना रविंद्र रामचंद्र आगरे यांचा पुतण्या व बहिणींनी एकत्रित मिळुन घराचे बांधकाम पुर्णत: पाडुन भुईसपाट करून आर्थिक नुकसान केल्याचे रवींद्र आगरे यांनी तंटामुक्त समितीकडे निवेदनाद्वारे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे. The construction of the disabled woman’s house collapsed

दरम्यान, तंटामुक्त समितीच्या बैठकीत चांगलाच हा मुद्दा गाजला असून तंटामुक्त समितीच्या बैठकीत याविषयी चर्चा होऊन सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तसा अहवाल गुहागर पोलीस ठाणे यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे. बेघर व अपंग महिलेच्या घराचे बांधकाम ताकदीच्या जीवावर, दंडेलशाहीने जमीनदोस्त करणाऱ्या व्यक्ती विरोधात तंटामुक्त समितीच्या सर्वच सदस्यांनी जाहीर निषेध केला. तसेच या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी, असेही सुचित करण्यात आले. The construction of the disabled woman’s house collapsed

वरवेली ग्रा.प. च्या तंटामुक्त समितीची सभा मंगळवारी तंटामुक्त समिती अध्यक्ष वैभव पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. प्रधानमंत्री आवास योजनेतून रवींद्र आगरे यांना दोन वर्षापूर्वीच घर मंजूर झाले असून या कामासाठी त्यांचे कुटुंबीय जागेची संमती देत नसल्याने वरवेली ग्रामपंचायतला पुढील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरांना लाभ देता येत नाही, पर्यायाने या योजनेचा इतरांना लाभ देण्यास अडचण निर्माण होत आहे. गेली दोन वर्ष या घराचे बांधकाम करण्यास सह हिस्सेदार अडचण निर्माण करत होते. मंजूर झालेले घर परत जाऊ नये यासाठी वडिलोपार्जित असलेल्या जमिनीत रवींद्र आग्रे यांनी घराचे बांधकाम सुरू केले. परंतु बांधकाम करत असतानाच सह हिस्सेदार यांनी ते बांधकाम जमीनदोस्त केले. The construction of the disabled woman’s house collapsed

या सभेत यावर तोडगा काढण्यासाठी बांधकाम जमीनदोस्त करणाऱ्या व्यक्तीनांही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु यातील एकही व्यक्ती सभेला उपास्थित शकली राहु नाही. तंटामुक्त समितीच्या माध्यमातून निमंत्रण देऊन सुद्धा सभेला उपस्थित राहून न शकणाऱ्या व्यक्तीविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. The construction of the disabled woman’s house collapsed

या सभेला अध्यक्ष वैभव पवार, सरपंच नारायण आगरे, उपसरपंच मृणाल विचारे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पवार, नरेश रांजाणे, पो. पा. सुजीत शिंदे, दिवाकर कानडे, आशिष विचारे, पंकज आगरे, प्रल्हाद विचारे, प्रतिक्षा किर्वे, संतोष अवेरे, विजय रांजाणे, अनंत जावळे, तलाठी गावित, ग्रा.म. सेवक महेद्र भुवड उपस्थित होते. The construction of the disabled woman’s house collapsed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजतंटामुक्त समितीताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share119SendTweet75
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.