खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती
रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनाबाबत खेड तालुक्याचा आढावा घेतला. खेड तालुक्यातील पूर प्रवण तसेच दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती घेत या ठिकाणच्या उपायोजनांची देखील माहिती घेतली. The Collector reviewed the disaster management


यावेळी त्यांनी अग्निशामक दल इमारत येथे भेट देऊन जीवाची पर्वा न करता पूर परिस्थितीत मदत कार्य करणाऱ्या विसर्जन कट्टा च्या जवानांशी चर्चा केली व त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कीर्ती किरण पुजार, उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आधी उपस्थित होते. The Collector reviewed the disaster management