फरार शिवरामला गुहागर पोलीसांनी केली होती अटक
गुहागर, ता. 01 : पोलीसांच्या हातावर तुरी देवून निसटलेल्या शिवराम नारायण साळवीला अवघ्या साडेचार तासांत ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी पकडले. आठ महिन्यांहून अधिक काळ शिवराम फरार होता. त्यालाही गणेशोत्सवात सापळा रचुन गुहागर पोलीसांनीच जेरबंद केले होते. The accused was found within four hours

30 सप्टेंबरला सायंकाळी 5 च्या सुमारास चिपळूण कोर्टातून दुचाकीवरुन येताना पोलीसाला लघुशंकेसाठी थांबवून चिखलीच्या जंगलात शिवराम साळवी पळून गेला होता. त्यामुळे पोलीसांच्या निष्काळजीपणावर बोट ठेवण्यात आले होते. गुहागर पोलीसांनी ग्रामस्थांच्या साह्याने चिखलीतील त्या जंगल परिसराला वेढा दिला. सर्वच बाजुंनी शोध मोहिम सुरू झाली. दरम्यान काळोख पडल्यावर जंगलातील श्र्वापदांची भिती वाटून शिवरामने चिखलीतील ग्रामदेवतेच्या मंदिराचा आसरा घेतला. ग्रामदेवतेच्या मंदिरावरही ग्रामस्थांचे लक्ष होते. शिवराम मंदिरात विसावताच त्यांनी पोलीसांना सांगितले. शुक्रवारी रात्री 9.30 वा. अवघ्या साडे चार तासात शिवरामला पोलीसांनी पकडले. The accused was found within four hours
गुहागर तालुक्यातील निगुंडळमध्ये रहाणाऱ्या शिवराम साळवीने एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फसवले होते. या प्रकरणात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा 2015 मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. सुमारे पाच वर्षांनी त्याला जामीन मिळाला. पण कोर्टात त्याची केस सुरु होती. जामीन मिळाल्यानंतर आपण सुटलो या आविर्भावात त्याने कोर्टातील तारखांना हजेरी लावली नाही. त्यामुळे अखेर कोर्टाने शिवराम साळवीवर अजामिनपात्र वॉरंट बजावले होते. The accused was found within four hours
2021 मध्ये कोर्टाने वॉरंट काढल्यापासून गुहागर पोलीस शिवराम साळवीचा शोध घेत होते. 8 महिने फरार असलेला शिवराम साळवी यंदा गणपती उत्सवाला घरी येणार याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली. त्यानंतर चिपळूण एस.टी.स्टॅण्ड परिसरात सापळा रचुन गुहागर पोलीसांनी शिवराम साळवी अटक केली. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 5 सप्टेंबरला गुहागर पोलीसांनी त्याला न्यायाधिशांसमोर हजर केले. त्यावेळी शिवराम साळवीला मा. न्यायाधिशांनी 30 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. The accused was found within four hours

30 सप्टेंबरला न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने शिवराम साळवीला कोर्टात हजर करायचे होते. त्याप्रमाणे गुहागरचे पोलीस त्याला घेवून कोर्टात गेले. यावेळीही त्याला जामीन मिळाला नाही. कोर्टाने 19 ऑक्टोबरपर्यंत शिवराम साळवीला न्यायालयीन कोठडी सुनावली. ही शिक्षा सुनावल्यानंतर कादवडकर पोलीस शिवरामला घेवून दुचाकीवरुन गुहागरला येत होते. त्यावेळी शिवरामने पोलीसांचा विश्र्वासघात केला. The accused was found within four hours
