तपासात धक्कादायक माहिती समोर
नवीदिल्ली, ता. 29 : पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाच ते सहा जणांनी पहलगाममध्ये पर्यटनासाठी आलेल्या लोकांना निशाणा बनवलं. या हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. या हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. याचे अनेक ठिकाणी पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या हल्ल्यामागचं पाकिस्तानी कनेक्शन समोर आलं आहे. Terrorist in Pahalgam attack, former para commando of Pakistan?
पहलगाममध्ये हल्ला करणारा दहशतवादी हा पाकिस्तानचा माजी पॅरा कमांडो असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे या हल्ल्यामागे थेट पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप होत आहे. तपास संस्थांच्या सूत्रांनुसार, पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी हाशिम मूसा असल्याचे संकेत मिळत आहेत. हाशिम मूसा हा पाकिस्तानचा नागरिक असून तो स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मूसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत. मूसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (SSG) माजी पॅरा कमांडो आहे. Terrorist in Pahalgam attack, former para commando of Pakistan?


पॅरा कमांडो म्हणून काही काळ काम केल्यानंतर तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत काम करू लागला.अलीकडेच त्याला काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं. त्याला जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते. या खुलाशामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण आणि किट पुरवणाऱ्या टीमचा देखील हाशिम मूसा भाग आहे. Terrorist in Pahalgam attack, former para commando of Pakistan?