“100% मुद्देमाल हस्तगत” व एका इसमास ताब्यात घेण्यामध्ये यश
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक येथे दिनांक ०२/०६/२०२५ रोजी श्री. हनुमान मांदिरातील लाकडी दान पेटी चोरून नेली असल्याची माहिती गुहागर पोलीस ठाण्यास मिळाली व त्याबाबत गुहागर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Temple theft exposed by Guhagar police


त्यानूसार मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे व मा. अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्रीमती. जयश्री गायकवाड, तसेच उपविभागिय पोलीस अधीकारी चिपळूण श्री. राजेंद्रकुमार राजमाने यांचे मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत यांनी लगेचच पोलीस ठाण्यातील एक पथक नेमले व गोपनीय माहिती व मंदिर व परिसरातील सी.सी.टी.व्ही फुटेज च्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याचा शोध घेऊन आरोपी सौरभ संतोष कदम रा. मळण रोड, शृंगारतळी ता. गुहागर जि. रत्नागिरी यास घटना घडल्या पासून अवघ्या 4 तासातच ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अटकेबाबत पुढील कार्यवाही चालू आहे. तसेच आरोपीने चोरून नेलेला १००% मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. Temple theft exposed by Guhagar police
वरील गुन्हा हा अवघ्या 4 तासात उघडकीस आलेला असून आरोपीने यासारख्या मंदिर चोर्या व घरफोडी सारख्या गुन्हे यापूवी केलेले आहेत का? याबाबत अधिक तपास चालू आहे. ही कामगिरी गुहागर पोलीस ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सचिन सावंत व पोलीस उपनिरीक्षक श्री. सुजीत सोनावणे, म.पो.ना/२०७४ स्वामिनी नाटेकर, पोकॉ/१९६ वैभव चौगले, पोकों/२७१ प्रतिक रहाटे, पोकॉ/१२७७ प्रथमेश कदम,) पोकॉ/७७९ निखील पाटील व म.पोकॉ/१४५३ सिमा मोरे या पोलिस अधिकारी व अमलदार यांनी पार पाडली. Temple theft exposed by Guhagar police