गुहागर, ता. 18 : श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई (दापोली – खेड – मंडणगड ) गट शिरवणे आयोजित रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२३-२४ वर्षातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज बंधू भगिनींचे स्नेहसंमेलन वाकवली येथे उत्साहात संपन्न झाले. Teli Samaj Snehasamelan
यानिमित्ताने सकाळीं श्री सत्यनारायण महापूजा व त्यानंतर श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा कोकण विभागाचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी, रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार, कार्याध्यक्ष दिपक राऊत, वधुवर मंडळ जिल्हाध्यक्ष व संगमेश्वर तालुकाध्यक्ष संतोष पावसकर, जिल्हा सचिव संदीप पवार, लांजा तालुकाध्यक्ष प्रकाश लांजेकर, जिल्हा सल्लागार अनंत भडकमकर, प्रसिद्ध साहीत्यिक अरुण इंगवले, काशिनाथ सकपाळ, जनता पतपेढी लांजा अध्यक्ष राजेश लांजेकर, संजय लांजेकर, तुषार लांजेकर, मुंबई विभाग महीला अध्यक्षा रोहीणी महाडीक, कोकण विभाग अध्यक्षा प्रियंका भोपळकर, जिल्हाध्यक्षा श्रेया महाडीक आदी मान्यवरांसह समाज बांधव उपस्थित होते. Teli Samaj Snehasamelan
हा कार्यक्रम तालुकाध्यक्ष डाॕ.संदीप महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रोहीणी महाडीक, दिपक राऊत, रघुविर शेलार,सतीष वैरागी, व अध्यक्षीय मनोगतात संदीप महाडीक यांनी मौलीक मार्गदर्शन केले. या सर्वच वक्त्यांनी आपण संघटित झालो तर आपण समाजाचे सर्वोतोपरी कशा पध्दतीने विकास साधू शकतो हे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद रहाटे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दापोली, खेड, मंडणगड तालुकाध्यक्ष डाॕ. संदीप महाडीक, मधुकर रहाटे, नरेंद्र महाडीक, मोद रहाटे, दिनेश राऊत, संतोष लांजेकर, अरविंद रहाटे, सुरेश महाडीक, सुरेश लांजेकर, रघुनाथ महाडीक, राकेश महाडीक, संदीप रसाळ, सविता महाडीक, रमाकांत रहाटे, कृष्णा राऊत, कीशोर रसाळ, विश्वनाथ राऊत, मुकुंद महाडीक, सुधीर राऊत, राजेंद्र महाडीक, श्रध्दा रहाटे, निशा रहाटे यांच्यासह दापोली खेड मंडणगड व मुंबई येथील सर्व तेली समाज बंधुभगिनींनी अतिशय मेहनत घेतली. Teli Samaj Snehasamelan