गुहागर, ता. 10 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागरच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व यशस्वी उद्योजक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे समाज बांधवांचा गुणगौरव समारंभ व नियोजित तेली समाज भवनाच्या प्रतिकृती आराखड्याचे अनावरण सोहळा भंडारी भवन, गुहागर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे होते. Teli Samaj Bhavan replica plan unveiled
या कार्यक्रमात नियोजित तेली समाज भवनाच्या प्रतिकृती आराखड्याचे अनावरण रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार व तालुका अध्यक्ष प्रकाश झगडे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांचे असे पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा गौरव करण्यात आला. Teli Samaj Bhavan replica plan unveiled


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये निलेश खेडेकर यांनी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाचा कामकाजाचा आढावा सादर केला. समाज स्थापनेपासून ज्या समाज बांधवांनी समाजाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले अशा सर्व समाज बांधवांचे नामोल्लेख करण्यात आला. यावेळी दहावी, बारावी, स्कॉलरशिप, नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा, डिग्री, व्यावसायिक अभ्यासक्रम व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणार्यां तसेच तालुक्यांतील उद्योजक समाज बांधवांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून संस्थेला सहकार्य करणारे अशोक रहाटे (पालपेणे), व संदीप महाडिक, (आबलोली) यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, ऋषिकेश रहाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Teli Samaj Bhavan replica plan unveiled


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश झगडे यांनी सांगितले की, गुहागर तालुक्यात सभासद नोंदणी प्रगतीपथावर असून संस्थेचे ५०० अधिक सभासद नोंदणी झाली आहे, यापुढे देखील सर्व समाज बांधवांनी सभासद नोंदणी करून सहकार्य करावे. नियोजित तेली समाज भवनासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. Teli Samaj Bhavan replica plan unveiled
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, खजिनदार दिनेश नाचणकर, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश महाडिक, सल्लागार अनंत भडकमकर, तेली समाज रत्नागिरी शहराध्यक्ष अमोल लांजेकर, रत्नागिरी शहर उपाध्यक्ष निलेश कोतवडेकर,सेवा आघाडी रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ सकपाल, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मुंबई युवा अध्यक्ष प्रवीण विजय रहाटे, उद्योजक पंढरी किर्वे, हॉटेल व्यावसायिक नरेश पवार, माजी तालुकाध्यक्ष एकनाथ रहाटे, पत्रकार गणेश किर्वे, मदन जाधव, गुहागर तालुका महिला समिती अध्यक्ष दिव्या किर्वे, प्राची पवार, रेश्मा रसाळ, उपाध्यक्ष दिलीप जाधव, खजिनदार विश्वनाथ रहाटे, तालुका सचिव प्रवीण रहाटे, सुहास रहाटे,अशोक रहाटे, सुधाकर रहाटे, रोहिणी रहाटे, अनिल राऊत, राजेंद्र राऊत, संदीप राऊत, संदीप महाडीक, नितिन रहाटे, युवक अध्यक्ष दिनेश झगडे, युवा उपाध्यक्ष राकेश राऊत, युवा सचिव दिनेश खेडेकर, सहसचिव प्रशांत रहाटे, युवा खजिनदार सुयोग पवार, माजी युवा अध्यक्ष प्रीतम रहाटे, सचिन राऊत, संजू लांजेकर, शुभम लांजेकर, राजेंद्र राऊत, राकेश रहाटे, राहूल जाधव, समाधान रहाटे, निलेश खेडेकर, समीर महाडिक, ऋषिकेश रहाटे, वैभव रहाटे, संदीप महाडिक, शैलेश किर्वे, अंकुर रहाटे आदी मान्यवर उपस्थित होते. Teli Samaj Bhavan replica plan unveiled


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश खेडेकर व राहुल जाधव यांनी केले तर आभार गणेश किर्वे यांनी मानले. शेवटी स्नेह भोजनाने कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कार्यकारणी युवा कार्यकारणी व महिला कार्यकारणी यांनी मेहनत घेतली. Teli Samaj Bhavan replica plan unveiled