• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. तेजानंद गणपत्ये हे कोकणातील पहिले आयर्नमॅन

by Guhagar News
July 5, 2023
in Ratnagiri
77 1
0
Honoring the Ironman Tejanand Ganapatye
152
SHARES
434
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा

रत्नागिरी, ता. 05 : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या सोबतच कोकणातील पहिला आयर्नमॅन बनण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर संपूर्ण कोकणातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉ. तेजानंद गणपत्ये यांच्या कामगिरीचा आदर्श घेत कोकण विभागातून भविष्यात नवनवीन आयर्नमॅन घडतील. Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

डॉ. गणपत्ये यांनी कर्करोगावर मात करून दोन वर्षे कठोर प्रयत्न केले आहेत. २०१९ मध्ये घशामध्ये गाठ आढळली व कर्करोगाचे निदान झाले. मुंबईत जाऊन केमोथेरपी, सर्व उपचार पूर्ण केले. पत्नी डॉ. अश्विनी अतिशय खंबीरपणे पाठिशी उभी राहिली. कुटुंबिय व मित्रमंडळींनी पाठबळ दिले. आजारमुक्त झाल्यावर वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली आणि मित्रांसोबत सायकलिंग सुरू केले. चिपळूण सायकलिंग क्लबने मोठा पाठिंबा दिला. केमोनंतर वर्षभरात अशक्यप्राय वाटणारी बीआरएम पूर्ण केली. Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

१५ तासांत उद्दिष्ट केले पार

आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एका पाठोपाठ करावयाच्या असतात. डॉ. तेजानंद हे 3.9 किलोमीटर पोहले. 2.47/100 मीटर या वेगाने त्यांनी हे अंतर १ तास ४५ मिनीटे २८ सेकंदात पूर्ण केले. 23.27 किमी/तास या वेगाने १८० किलोमीटर सायकलिंग केले. याकरिता त्यांना ७ तास ४४ मिनीटे व ९ सेकंदाचा वेळ लागला. त्यानंतर त्यांना धावायचे होते. त्यांनी 42 किलोमीटर धावण्यासाठी ५ तास २९ मिनीटे १४ सेकंद लागले. 07.49 मिनिट्स प्रति किमी या वेगाने ते धावले. हे तीनही क्रीडा प्रकार एका पाठोपाठ पूर्ण केले. याकरिता त्यांना एकूण वेळ १५ तास १७ मिनीटे व ४२ सेकंद लागले. या वेळेत त्यांनी एकंदर अंतर २२६.७ किमी अंतर पार केले. Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

आयर्नमॅन होण्यापूर्वी ७ स्पर्धांत यश

डॉ. गणपत्ये यांनी धावणे, पोहणे, सायकलिंगचा नियमित सराव पुन्हा सुरू केला. कोल्हापूरचे आयर्नमॅन पंकज रावळू यांच्याकडे मार्गदर्शन घेऊन प्रशिक्षण सुरू केले. रोज एक ते दीड तास सराव, शनिवार-रविवार २ ते ३ तास सराव असे शेड्युल होते. कागल येथे ऑलिंपिक डिस्टन्स, नगर येथे 21 किलोमीटर रनिंग हाफ मॅरेथॉन, ऑलिंपिक डिस्टन्स ट्रायथलोन (बेळगाव) आणि पुणे, कोल्हापूर, सातारा येथे ३ हाफ मॅरेथॉन, कोल्हापूर येथे हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलोन पूर्ण केल्या. त्यानंतर कझाकिस्तान येथे यश मिळवून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला. Tejanand Ganapatye is the first Ironman from Konkan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIronmanLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTejanand Ganapatye is the first Ironman from KonkanUpdates of Guhagarआयर्नमॅनगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.