गुहागर, ता. 08 : गुहागर शहर दिव्यांग संस्थेमार्फत गुहागर तालुक्याच्या तहसिलदार मा. प्रतिभा वराळे मॅडम यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. चंद्रशेखर लोखंडे, सेक्रेटरी. श्री. भरत कदम, खजिनदार श्री. अनंत घोरपडे, श्री. अनिल चाळके, सौ. कोमल सांगळे, आकांक्षा जोशी, सल्लागार श्री. संदीप भाटकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. Tehsildar felicitated by Disability Organization
तहसिलदार वराळे मॅडम यांनी संस्थेच्या प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमाच्या निमंत्रणाला मान देऊन प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती व यथोचित सहकार्य करत आहेत. या संस्थेचे संजीव गांधी निराधार योजना व स्वतंत्र दिव्यांग प्राधान्य कुटुंब योजनेचे अनेक दिव्यांग बंधु-भगिनी लाभार्थी म्हणून लाभ घेत आहेत, ते फक्त तहसिलदार. वराळे मॅडम यांच्यामुळे मिळाले आहे. अधिकारी कसा असावा , तर तो प्रतिभा वराळे मॅडम सारखा असावा. त्यांनी गुहागर मधील दिव्यांगांना समाजामध्ये सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी व स्वावलंबी बनण्याचे वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. आजपर्यंत त्यांनी गुहागर शहर दिव्यांग संस्थेसाठी केलेल्या सर्वोतोपरी सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेमार्फत करण्यात आला. Tehsildar felicitated by Disability Organization
तसेच यावेळी संजीव गांधी निराधार कार्यालयाचे प्रमुख अधिकारी श्री. वासावे, तलाठी श्री. गावित व त्यांचे सहकारी यांचाही गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश परकर, संतोष मोरे, दिलीप शेटे, मालप गुरुजी, परेश हळये, प्रविण गोयथळे, असलम माहिमकर, दर्पना दिनकर आरेकर, गणेश मालप, अपर्णा जोशी, पल्लवी हळये आदि दिव्यांग व त्यांचे पालक उपस्थित होते. Tehsildar felicitated by Disability Organization