देशभरातील 139 तीर्थस्थळं मोफत फिरण्याची सुवर्णसंधी
हिंदूंच्यादृष्टीने महत्वाची असणारी ‘महाराष्ट्र मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ तसे बघायला गेले तर सर्व सामाजिक घटकांचा विचार करून योजली गेली आहे. या योजनेत हिंदू धर्मातील प्रमुख मंदिरे, बौध्द तीर्थस्थळे, वैशिष्टपूर्ण चर्च आणि मुस्लीम तीर्थस्थळांचा देखील समावेश केला गेला आहे. महाराष्ट्र सरकारने देशभरातील ७३ आणि राज्यातील ६६ अशा १३९ धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. त्यामुळे अल्पसंख्याकविरोधी असा शिक्का पडलेल्या महायुती सरकारने या योजनेला केवळ ‘हिंदूकेंद्रित’ ठेवलेले नाही.
सर्वधर्मियांचा विचार करणारे सरकार
भारत देशात विविध धर्मांचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत. ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते. महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परांपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात. आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतानादेखील आपल्या देवदेवतांचे/भगवंतांचे नामस्मरण, चिंतन करीत आयुष्य जगत असतात.
देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मांची मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तर जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे व कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.
याच गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठया तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्वधर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची व दर्शनाची संधी देण्यासाठी शिंदे – फडणवीस – अजित पवार सरकारने “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” राज्यात सुरु केली आहे.
काय आहे Teerth Darshan Yojana
राज्यातील सर्व धर्मीयाांमधील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्याांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थी असतील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखांपेक्षा जास्त नसावे ही या योजनेची महत्वाची अट आहे.
‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश केला गेला आहे. या योजनेंतर्गत तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु. ३०,०००/- इतकी आखली आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश आहे.
Teerth Darshan Yojana : महाराष्ट्र
या योजनेमध्ये राज्यातील ६६ तीर्थस्थळांचा समावेश आहेत. यामध्ये मुंबईतील १५ धार्मिक स्थळं या यादीत आहेत. यामध्ये सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी , विपश्यना शिवालय, एक आराधनालय, वांद्रे येथील माउंट मेरी चर्च आणि सेंट अँड्र्यूज चर्च, याशिवाय नाशिकमधील जैन मंदिर आणि नागपुरातील दीक्षाभूमी, जिथे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला या स्थळांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील तीर्थस्थळे
सिद्धिविनायक मंदिर, मयुरेश्वर मंदिर, मोरगाव, चिंतामणी मंदिर, थेऊर, गिरिजात्मज मंदिर, लेण्याद्री, महागणपती मंदिर, रांजणगाव, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, मरोळ, मॅगेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळा, महालक्ष्मी मंदिर, गोदीजी पार्श्वत मंदिर, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च, चैत्यभूमी दादर, नेसेट एलियाहू सिनेगॉग, फोर्ट, अग्यारी / अग्निमंदिर, माउंट मेरी चर्च (वांद्रे), शार हरहमीम सिनेगॉग, मस्जिद, जोतिबा मंदिर, मुंबादेवी मंदिर, भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर, खेड , संत तुकाराम महाराज समाधी मंदिर, खंडोबा मंदिर, जेजुरी, वाळकेश्वर मंदिर, मलबार हिल, संत चोखामेळा समाधी, पंढरपूर, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदी, विश्व विपश्यना पॅगोडा गोराई, संत सावतामाळी समाधी मंदिर अरण, जैन मंदिर, कुंभोज, गुरु गोविंद सिंग समाधी, हजूर साहिब, नांदेड, चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, विठोबा मंदिर, पंढरपूर, रेणुका देवी मंदिर, माहूर, खंडोबा मंदिर, मालेगाव, सेंट अँड्र्यू चर्च (वांद्रे), शिखर शिंगणापूर, श्री संत नामदेव महाराज देवस्थान, उब्रज ता. कंधार, सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च (अंधेरी), तुळजा भवानी मंदिर, तुळजापूर , संत एकनाथ समाधी, पैठण, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळ, जैन स्मारके, एलोरा लेणी, विघ्नेश्वर मंदिर, ओझर, संत निवृत्तीनाथ समाधी, त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वर, मुक्तीधाम, सप्तशृंगी मंदिर, वणी, काळाराम मंदिर, जैन मंदिरे, मांगी-तुंगी, गजपंथ, संत साईबाबा मंदिर, शिर्डी, सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक, शनी मंदिर, शनी शिंगणापूर, श्रीक्षेत्र भगवानगड, पाथर्डी, बल्लाळेश्वर मंदिर, पाली, संत गजानन महाराज मंदिर, शेगाव, एकवीरा देवी, कार्ला, श्री दत्त मंदिर, औदुंबर, केदारेश्वर मंदिर, वैजनाथ मंदिर, परळी, पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर मंदिर, महाकाली देवी , श्री. काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिर, अष्टदशभुज (रामटेक) , दीक्षाभूमी , चिंतामणी (कळंब),
Teerth Darshan Yojana : अन्य राज्य
अन्य राज्यातील 73 तिर्थस्थळांना भेट देण्याची इच्छाही या योजनेतून पूर्ण होऊ शकते. यामध्ये वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ यात्रा, अमृतसरमधील सुवर्ण मंदिर, चार धाम यात्रा, अयोध्येतील राम मंदिर, द्वारकामधील सोमनाथ मंदिर आणि ओडिशातील जगन्नाथ पुरी अशा मोठ्या यात्रास्थळांबरोबर जम्मू काश्मीर, दिल्ली, उत्तराखंड, झारखंड, उत्तरप्रदेश, ओरिसा, बिहार, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, या राज्यातील प्रमुख देवस्थानांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे.
जम्मू आणि काश्मिर : वैष्णोदेवी मंदिर, अमरनाथ गुहा
पंजाब : सुवर्ण मंदिर, अमृतसर
दिल्ली : अक्षरधाम, दिगंबर जैन लाल मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर
उत्तराखंड : बद्रीनाथ, गंगोत्री, केदारनाथ, यमुनोत्री, नीळकंठ महादेव मंदिर,
झारखंड : बैद्यनाथधाम, श्री सम्मेद शिखरजी (गिरिडीह)
उत्तरप्रदेश, काशी विश्र्वनाथ, इस्कॉन, श्रीराम मंदिर, देवगड
ओरीसा – सुर्यमंदिर, जगन्नाथ मंदिर, लिंगराज, मुक्तेश्र्वर,
आसाम – कामाख्यादेवी,
बिहार – महाबोधी, पावापुरी,
राजस्थान – रणकपुर, अजमेर दर्गा, दिलवाडा मंदिर,
गुजराथ- सोमनाथ, द्वारकाधीश, नागेश्र्वर, शत्रुंजय हिल, गिरना,
मध्यप्रदेश – सांची स्तुप, खजुराहो, महाकालेश्र्वरर, ओकांरेश्र्वर मंदिर, ममलेश्र्वर मंदिर, ब्रह्मपुरी, उदयगिरी
कर्नाटक – रंगनाथस्वामी, गोमटेन्वर, विरुपाक्ष, चेन्नकेशव, अन्नपूर्णश्र्वरी, गोकर्ण महाबळेश्रवर, भूतनाथ, मुरुडेश्र्वर, आयहोल दुर्गा मंदिर, श्रीकृष्ण, मंदिर, वीर नारायण मंदिर,
आंध्रप्रदेश – तिरुपती बालाजी, मल्लिकार्जुन
तामिळनाडू – बृहदीश्र्वर, मीनाक्षी, रामनाथस्वामी, कांचिपुरम, रंगनाथस्वामी, अरुणाचलेश्र्वर, कैलासनाथ, एकंबरेश्र्वर, सारंगपानी, किनारा, मुरगन मंदिर,
केरळ – पद्मनाभस्वामी, गुरुवायूर, वडक्कुत्राथन, पार्थसारथी, शबरीमाला, अट्टकल भगवती मंदिर, श्रीकृष्ण, थिरुनेल्ली, वैकोम महादेव, तिरुवल्ला, शिवगिरी मंदिर
योजनेचा जी.आर. आणि समाविष्ट केल्या गेलेल्या तीर्थ स्थळांची यादी पहाण्यासाठी याठिकाणी क्लिक करावे. https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407141449472222%E2%80%8D….pdf