गुहागर, ता. 06 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्य विद्यामंदिर, स.सु. पाटील विज्ञान, श्री. म. ज. भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 35 विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षक बनून त्या दिवशीचा सर्व कार्यभार सांभाळला. Teacher’s Day Celebration at Guhagar Junior College

५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारत भर साजरा केला जातो. या दिवशी महाविद्यालयात 35 विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून इ.11 वी व 12 वीच्या वर्गात अध्यापन केले. कु. अश्विन मोहिते याने मुख्याध्यापक, कु. मसुद घारे याने उपमुख्याध्यापक व कु. प्रणाली घाडीगावकर हीने पर्यवेक्षक पदाचा कार्यभार पाहिला. यावेळी विज्ञान, वाणिज्य, कला शाखांचे सर्व विषयांचे अध्यापन घेण्यात आले. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला. Teacher’s Day Celebration at Guhagar Junior College

या कार्यक्रमामध्ये कु सुधिक्षा भागडे, कु.सेजल भेकरे, कु. सलोनी करंदेकर व विद्यार्थी मुख्याध्यापक कु.अश्विन मोहिते यांनी आपला अनुभव आपल्या मनोगता मधून व्यक्त केले. श्रीमती. भाटकर मॅडम यांनी शिक्षक विद्यार्थ्यांना खूप तळमळीने अध्यापन करतात. विद्यार्थ्यांनी ही तळमळ समजून घ्यावी, हे मत मनोगता मधून व्यक्त केले. श्री. देशपांडे सरांनी शिक्षकी पेशा हा सेवाभाव आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण असावेत या संदर्भात मार्गदर्शन केले. सौ. मनाली बावधनकर यांनी शिक्षक हा समाजिक अभियंता आहे. राष्ट्र उभारणीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षीय मनोगतामध्ये उपमुख्याध्यापक श्री. कोरके यांनी करियर निवडताना शिक्षक होण्याचे ही करियर निवडा. कारण मनाला आनंद, समाधान या करियरमध्ये मिळते, असे ते म्हणाले. Teacher’s Day Celebration at Guhagar Junior College

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रणाली घाडीगावकर हीने केले. आभार कु. मसुद घारे याने मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कु. समृद्धी मोरे व कु. अदिती पवार ह्यांनी केले. कार्यक्रमसाठी शाळा व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. दिपक कनगुटकर व संस्था अध्यक्ष श्री. महेश भोसले, सर्व पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. कोरके, पर्यवेक्षक सौ. सुजाता कांबळे, श्री. मधुकर गंगावणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. आर पी खोत, डी एच मेटकरी, ए एच देशपांडे, एम एम बावधनकर, डी आर माळी, आर आर पालशेतकर, एस एस भाटकर, पी बी अनगुडे, पी एच कटरे, एन एन पाटील, पी डी वैद्य के के परचुरे, एस व्ही फिलसे के ए गुरव, प्रज्ञा ढाकणे प्रयोग शाळा सहाय्यक डी आर मोहिते, दिलीप मोरे तसेच रवींद्र.मालप व श्रीमती विखारें यांनी सहकार्य केले.
Teacher’s Day Celebration at Guhagar Junior College

