इन्फिगो आयकेयर हॉस्पिटलचे आयोजन ; दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ०२:३० वा.
रत्नागिरी, ता.08 : विद्यार्थ्यांचे उत्तम शिक्षण होण्यासाठी पालकांची महत्वाची भूमिका असते. या संदर्भात शिक्षक व सुजाण पालक प्रेरणा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. ही कार्यशाळा शनिवार दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ०२:३० वा. अंबर हॉल गणेश कॉलनी, कोल्हापूर महामार्ग रत्नागिरी येथे इन्फिगो आयकेयर हॉस्पिटल (Infigo EyeCare Hospital) रत्नागिरी यांच्या कडून आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रसिद्ध प्रेरक वक्ते यजुवेंद्र महाजन हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला शिक्षक व शालेय विद्यार्थी पालक यांनी उपस्थित राहावे ,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. Teachers and parents workshop in Ratnagiri


या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी वामनराव जगदाळे, इन्फिगो आयकेयर हॉस्पिटलचे डॉ. श्रीधर ठाकूर उपस्थित राहणार आहेत. Teachers and parents workshop in Ratnagiri
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते यजुवेंद्र महाजन हे व्यवसाय मार्गदर्शन व व्यक्तीमत्व विकास विषयाचे प्रशिक्षक आहेत. व्यक्तिमत्व विकास, सुजाण पालकत्व आदि या विषयांवर आजवर २००० हून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेतलेल्या शिक्षक, विद्यार्थी व पालकांची संख्या नऊ लाखांहून अधिक आहे. शिक्षक प्रशिक्षण या विषयावर पुणे विद्यापीठात संशोधन केले आहे. सुमारे ७० हजार शिक्षकांना त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. दोन लाख विद्यार्थी व दहा हजार शिक्षकांना त्यांनी प्रेरणादायी पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. महाजन यांनी अभ्यास मित्र, करियर मित्र, पालक मित्र, स्पर्धा परीक्षा आत्मविश्वास अशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शिक्षण क्रांती गौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे. आजवर पंधरा संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार दिले आहेत. काही शासकीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. Teachers and parents workshop in Ratnagiri


या कार्यक्रमाला शालेय शिक्षक, पालक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन इन्फिगो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ श्रीधर ठाकूर यांनी केले आहे. Teachers and parents workshop in Ratnagiri