श्री महामाई सोनसाखळी देवी
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी देवीच्या शिमगोत्सवाला रविवार दि. 24 रोजी पासून सुरुवात होत आहे. तरी सर्व सर्व भाविकांनी पालखी देवदर्शनाचा लाभ घ्यावा. अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे. Tavasal Shimgotsav
![Tavasal Shimgotsav](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/gn2032-300x169.jpg)
![Tavasal Shimgotsav](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/gn2032-300x169.jpg)
रविवार दि. 24 रोजी रात्रौ 10.30 वाजता देवीचा रूपा लागेल व त्या नंतर मंदिरातून पालखी होमावर जाईल. सोमवार दि. 25 रोजी सकाळी 10.30 वाजता पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ गावी येईल. मंगळवार दि. 26 रोजी सकाळी 11 वाजता पालखी होमावर जाईल नंतर 12 वाजता होम पेटवला जाईल. त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होईल, दुपारी 2 वाजता पालखी सहाणेवर येईल. दुपारी 3.30 वाजता पालखी तवसाळ आगर होमावर जाईल, व सायंकाळी पालखी सहानेवर विराजमान होईल. तरी श्री देवी आई महामाई सोनसाखळी देवीच्या सर्व भाविकांनी पालखी देवदर्शनाचा लाभ घ्यावा. अशी विनंती मंडळातर्फे करण्यात आली आहे. Tavasal Shimgotsav
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-1-1.jpg)
![](https://guhagarnews.com/wp-content/uploads/2024/03/adv-1-1.jpg)