• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ बाबरवाडीने जिंकला युवा चषक

by Mayuresh Patnakar
December 31, 2022
in Sports
307 3
0
Tavasal Babarwadi won the youth cup
602
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित; उपविजेता पालपेणे मधलीवाडी संघ

गुहागर, ता. 31 : कुडली माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित गुहागर तालुका अंतर्गत यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 या चषकावर तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट संघाने नाव कोरले. 20 हजार रुपयांच्या रोख बक्षिसासहीत आकर्षक चषक पटकावल्याचा आनंद बाबरवाडी क्रिक्रेट संघातील खेळाडूंबरोबरच तवसाळमधील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरुनही ओसंडून वहात होता. Tavasal Babarwadi won the youth cup

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

तालुक्यातील कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठानने तालुकास्तरीय यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 स्पर्धेचे आयोजन केले होते. दिनांक 24 व 25 डिसेंबर 2022 असे दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना तवसाळ बाबरवाडी क्रिकेट संघ आणि पालपेणे मधली वाडी संघ यांच्यात रंगला. प्रथम गोलंदाजी करताना बाबरवाडी संघाच्या गोलंदाजानी पालपेणे मधली वाडी संघाला 21 धावांवर रोखले. माजी सरपंच संदीप जोशी यांच्यासह प्रतिक, दिवेश आणि प्रविण यांनी छान गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या नरेश, गणेश व आशिष यांनी जबाबदारीने खेळ करत तवसाळ बाबरवाडी संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून दिला. Tavasal Babarwadi won the youth cup

Tavasal Babarwadi won the youth cup

या सामन्यातील विजेता तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट संघाचा मान्यवरांच्या हस्ते रोख रु. 20 हजार आणि आकर्षक चषक देवून सन्मान केला. तर रोख रु. 15 हजार आणि चषक देवून उपविजेत्या पालपेणे मधलीवाडी क्रिकेट संघाला गौरविले. उत्कृष्ट फलदांज म्हणून पालपेणे संघातील स्वप्निल, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तवसाळ बाबरवाडी संघातील संदिप जोशी, मालिकावीर म्हणून नरेश नाचरे या खेळाडुंची निवड करण्यात आली. Tavasal Babarwadi won the youth cup

तवसाळ बाबरवाडी संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिपक जोशी, बाबरवाडीचे अध्यक्ष सुधाकर येद्रे यांनी अभिनंदन केले आहे. Tavasal Babarwadi won the youth cup 

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTavasal Babarwadi won the youth cupUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share241SendTweet151
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.