• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तात्यासाहेब नातू महाविद्यालयाचे निवासी शिबिर संपन्न

by Guhagar News
January 5, 2024
in Guhagar
62 1
1
Tatyasaheb Natu College residential camp completed
122
SHARES
348
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 03 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर कात्रोळी, कुंभारवाडी येथे संपन्न झाले. या शिबिरात ग्रामस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. Tatyasaheb Natu College residential camp completed

हे शिबिर मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. जयसिंगराव मोरे सचिव श्री.मोहनराव चव्हाण सहसचिव श्री. शशिकांत चव्हाण प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता काटकर, कात्रोळी गावचे सरपंच श्री. श्रीकांत  निवळकर यांच्या  प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. नामदेव डोंगरे यांनी केले. सात दिवस राबवलेल्या उपक्रमाचा थोडक्यात आढावा घेऊन शिबिरासाठी सहकार्य केलेल्या ग्रामस्थांचे व श्री. प्रमोद निवळकर, श्री. अशोक निवळकर, श्री. प्रवीण निवळकर, श्री प्रकाश शेठ निवळकर, श्री. सुधाकर गुजर व स्थानिक व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानले. Tatyasaheb Natu College residential camp completed

प्रातिनिधिक स्वरूपात कुमारी स्नेहल पेजले कुमार साहिल पवार या दोन स्वयंसेवकाचा गुलाब पुष्प देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सौरभ कांबळे, अनिकेत घाडे, ऋतुजा पवार, आरती जामसुतकर या स्वयंसेवकानी  शिबिरात आलेले अनुभव सांगितले. या शिबिरात शिस्त, श्रम प्रतिष्ठा, सामूहिक जीवन, नियोजन इत्यादी चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्याचे नमूद केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता काटकर यांनी गावातील लोकांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार मानले. यानंतर सरपंच श्री. श्रीकांत निवळकर यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिरातील दिनक्रम व राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व महाविद्यालयास धन्यवाद दिले. संस्थेचे सचिव श्री. मोहन चव्हाण, सहसचिव श्री.शशिकांत चव्हाण यांनी स्वयंसेवकांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व ग्रामस्थांचे आभार मानले.  Tatyasaheb Natu College residential camp completed

यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून सौरभ कांबळे, अंजली जाधव तर श्रमदानासाठी साहिल पवार, प्रसाद गुरव, गायन आणि  पैलू कामगिरीसाठी सौरभ सुर्वे या स्वयंसेवकाचा मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.  प्रमुख मार्गदर्शन करताना श्री. जयसिंगराव मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापनेपासून आढावा घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे सामूहिक कार्य असून गावामध्ये अनेक सामाजिक हिताचे उपक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबवता येतात. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन कार्य करण्याचे आवाहन केले.  Tatyasaheb Natu College residential camp completed

सात दिवस चाललेल्या या शिबिरात श्रमदानाच्या माध्यमातून कात्रोळी गौर डोह येथील श्री.विसर्जन घाट स्वच्छता, गुजरवाडी येथे सार्वजनिक रस्त्याची साफसफाई, गुजरवाडी येथे स्वच्छ भारत मोहीम, कळमुंडकरवाडी येथे वनराई बंधारा, मराठी शाळेची साफसफाई करून शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्यासाठी पिंपळ या देशी वृक्षाचे वितरण केले. बौद्धिक सत्रात फहीम खडस यांचे आपत्ती व्यवस्थापन, श्री. शिरीष काटकर यांचे युवा पिढीचे आजचे आदर्श ह. भ .प. श्री. सचिन महाराज यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन श्री. प्रांजल पवार यांचे पोस्ट विभागाच्या आर्थिक योजना, श्री. शत्रुघ्न मेत्रे यांचे शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाच्या योजना, श्री राजेंद्र वेलोंडे व श्री. प्रतीक चव्हाण यांनी वित्तीय साक्षरता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले. Tatyasaheb Natu College residential camp completed

तसेच रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे आयोजन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संगीता काटकर कार्यक्रमाधिकारी डॉ. नामदेव डोंगरे, स.प्राध्यापक विक्रांत टेरवकर, श्री .भरत देवरुखकर यांनी केले. शिबिरासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. Tatyasaheb Natu College residential camp completed

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTatyasaheb Natu College residential camp completedUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share49SendTweet31
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.