• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

by Ganesh Dhanawade
March 7, 2023
in Guhagar
91 1
0
Talwali Gram Deva's Shimgotsav
179
SHARES
510
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि. 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्री सुकाई देवीची पालखी ग्रामदेवता मंदिरातून सहाणेवरती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली. Talwali Gram Deva’s Shimgotsav

Talwali Gram Deva's Shimgotsav

श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात. या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून गावभोवणीसाठी बाहेर पडतात. तसेच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात. यावेळी आंब्याचे झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे. यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. अशाच पद्धतीने यावर्षी देखील देवीची पालखी व माडवळ नाचवत मोठ्या उत्साहात गावातून सहाणे वरती आणण्यात आली. त्यानंतर रात्री होम पेटवून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला. Talwali Gram Deva’s Shimgotsav

या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरणार रहाते. त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. यावेळी देवीच्या शिमगोत्सवात पालखी व माडवळ नाचवण्यासाठी भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. Talwali Gram Deva’s Shimgotsav

गुढीपाडव्यापर्यंत श्री सुकाई देवीचा हा शिमगोत्सव चालणार असून गुढीपाडव्याला या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. दरवर्षी अत्यंत शांततेत हा शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. या शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीने केले आहे. Talwali Gram Deva’s Shimgotsav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTalwali Gram Deva's ShimgotsavUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share72SendTweet45
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.