शृंगारी उर्दू हायस्कूल येथे ५० वे विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
गणेश किर्वे, वरवेली
गुहागर, ता. 10 : पंचायत समिती गुहागर, शिक्षण विभाग व शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे शृंगारी उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम विज्ञान नगरीमध्ये ५० वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. या उद्घाटन कार्यक्रमांसाठी अंतराळवीर आरती पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. Taluka Level Science Exhibition


या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांनी विज्ञान प्रदर्शनाची रूपरेषा स्पष्ट केली. तहसिलदार प्रतिभा वराळे यांनी सांगितले की, अंतराळवीर आरती पाटील यांनी वेळेत वेळ काढून या विज्ञान प्रदर्शनाला हजेरी लावली आहे. त्यांचा अनुभव व जीवनप्रवास व त्यांनी केलेली प्रगती समजून घेणे गरजेचे आहे. आजच्या युगात विज्ञान प्रदर्शन भरवून विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आवड निर्माण करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. या कार्यक्रमाची सुरूवात सकाळी विज्ञान दिंडी व शोभा यात्रेने करण्यात आली. या शोभा यात्रेमध्ये अंतराळवीर आरती पाटील यांच्यासह तालुक्यातील विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. Taluka Level Science Exhibition
यावेळी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, गुहागरच्या तहसिलदार प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी लिना भागवत, शृंगारी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शब्बीर बोट, सेक्रेटरी रमजान साल्हे, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष रविंद्र इनामदार, संस्थेचे संचालक असीम साल्हे, शृंगारी उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती शगुफ्ता सौराज, विस्तार अधिकारी गणपत पांचाळ, रायचंद्र गळवे, जिल्हा विज्ञान मंडळ कार्य. सदस्य सुदेश कदम, गुहागर तालुका विज्ञान मंडळ अध्यक्ष भोजा घुटुकडे, गणेश कुलकर्णी, संतोष गजभार, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष मंगेश गोरीवले, केंद्र प्रमुख श्रीकांत वेल्हाळ, लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते. Taluka Level Science Exhibition


स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवीवर्षात होत असलेले विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणारे तसेच विज्ञान विषयक दैदिप्यमान इतिहासाला उजाला देणारे ठरले आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवन सुखकर होत आहे. भविष्यातील मानवाची वाटचाल अधिक सुकर व्हावी यासाठीच शिक्षण विभागामार्फत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. Taluka Level Science Exhibition