भाजप तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी
गुहागर, ता. 30 : पर्यटन स्थळ विकास कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनाऱ्याचा नव्याने विकास करावा. हेदवी येथील दुर्लक्षित बामणघळ येथे सुरक्षित रस्ता व कठडा बांधावा. गुहागर, वेळणेश्र्वर व पालशेत येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांसाठी सोईसुविधा द्याव्यात. अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचेकडे केली आहे. Taluk President Surve’s request to Tourism Minister
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, महिला व बालविकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता या खात्यांचे मंत्री मंगलप्रभात लोढा रत्नागिरी येथे आले होते. त्यावेळी भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे यांनी त्यांची भेट घेतली. तवसाळ, हेदवी, वेळणेश्र्वर, पालशेत व गुहागर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावल मंत्री लोढा यांनी केवळ मागणी करु नका, कोणत्या कामांची आवश्यकता आहे त्याचे लेखी पत्र देण्यास सांगितले. नीलेश सुर्वे यांनी तत्काळ सुमारे 1 कोटी 60 लाखाच्या निधीची मागणीचे पत्र त्यांना दिले. Taluk President Surve’s request to Tourism Minister
जयगड तवसाळ फेरीबोट, अँगलींग फिशींग, ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनामुळे तवसाळ येथील समुद्रकिनाऱ्यावरही आता पर्यटक येऊ लागले आहेत. त्यामुळे येथील समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा तवसाळ खुर्द सावर्डे ते तवसाळ बंदर रस्ता रस्ता तयार करणे. (२५ लाख रु.), तवसाळ खुर्द समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकरता आसन व्यवस्था करणे. (५ लाख रु.), तवसाळ खुर्द फेरीबोट धक्का, गणपती मंदिर ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत सौर पथदीप बसवणे (१५ लाख रु.), तवसाळ खुर्द येथील घोडबावीचे सुशोभिकरण करणे (10 लाख), तवसाळ काशिवडे समुद्रकिनारी पर्यटकांकरीता आसन व्यवस्था करणे (5 लाख) अशी कामे सुर्वे यांनी सुचवली आहेत.
हेदवीच्या समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या बामणघळ येथे पावसाळी पर्यटन बहरु शकते. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे तसेच वर्षभरात उधाणाची भरती येते त्यावेळी बामणघळीतून निसर्गनिर्मित 25 ते 30 फुट उंच उडणारे पाण्याचे फवारे पर्यटकांना आकर्षित करु शकतात. मात्र तेथे संरक्षक कठडा आणि सुरक्षित रस्त्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेवून हेदवी स्मशानभूमी ते ब्राह्मण घळ पर्यंत रेलिंग सह आरसीसी पाखाडी बांधणे. (25 लाख), हेदवी येथील पर्यटकांना आकर्षित करणारी बामणघळ संरक्षित करणे (10 लाख), हेदवी समुद्रकिनारी सौर पथदिवे बसवणे (5 लाख), हेदवी जालगावकरवाडी ते उमामहेश्वर मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण (15 लाख) या कामांची मागणी केली आहे. Taluk President Surve’s request to Tourism Minister
याशिवाय गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकरीता अद्ययावत चेजिंग रुम व शौचालयाची व्यवस्था (15 लाख), गुहागर समुद्र किनाऱ्यावरती लहान मुलांकरीता फायबरच्या खेळण्याची व्यवस्था करणे (15 लाख), पालशेत समुद्रकिनारी पर्यटकांकरता आसन व्यवस्था तयार करणे (5 लाख), पालशेत मुख्य रस्ता ते पालशेत बंदर टोक रस्ता तयार करणे (10 लाख) वेळणेश्वर समुद्रकिनारी पर्यटकांना बसण्याकरता गॅलरी बांधणे (15 लाख) या कामांची मागणी नीलेश सुर्वे यांनी पर्यटन मंत्री लोढा यांचेकडे केली आहे. Taluk President Surve’s request to Tourism Minister