• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा

by Ganesh Dhanawade
December 23, 2022
in Guhagar
99 1
0
Taluk Level Scholarship Practice Exam
194
SHARES
553
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अखिल गुहागर ता. प्राथमिक शिक्षक संघ व पं. स. शिक्षण विभागातर्फे

गुहागर, ता. 23 : अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुकास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन 23 डिसेंबर 2022 रोजी गुहागर तालुक्यातील सर्व केंद्र शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा लाभ मराठी माध्यमातील 513 विद्यार्थ्यांना व उर्दू माध्यमातील 26 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना झाला आहे. Taluk Level Scholarship Practice Exam

तालुक्यातील इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालामध्ये वाढ व्हावी, गुणवत्तेच्या दृष्टीने गुहागर तालुका अग्रेसर राहावा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ व्हावी, म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन गुहागर तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी एल जी भागवत मॅडम तसेच सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. Taluk Level Scholarship Practice Exam

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

एकच ध्यास करू गुणवत्ता विकास याप्रमाणे गुहागर तालुक्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा निर्माण व्हावी म्हणून सदर उपक्रमाचे आयोजन अखिल प्राथमिक शिक्षक संघटना यांच्यावतीने करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी लीना भागवत, अखिल परिवाराचे अध्यक्ष मनोज पाटील सरचिटणीस संजय जंगम सर, शिक्षक नेते चंद्रकांत पागडे सर, शिक्षण विस्तार अधिकारी आर एच गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी कासारे साहेब, सुर्वे साहेब, शिंदे, अमोल धुमाळ सर, नंदिनी किर, श्रुती शेलार, प्रथमेश देसाई, विकी पवार, राहुल जाधव, गुहागर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नेते पदाधिकारी अध्यक्ष यांच्या सक्रिय सहयोगातून संपन्न झाले. Taluk Level Scholarship Practice Exam

त्यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी लीना भागवत म्हणाल्या की, शिष्यवृत्ती परीक्षेत सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उज्वल यश संपादन करता यावे म्हणून अखिल प्राथमिक शिक्षक संघाने उचललेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना योग्य सराव व योग्य मार्गदर्शन यामुळेच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होणार आहे. या कामी सर्व शिक्षक संघटना यांचे सहकार्य लाभत आहे. अखिल शिक्षक संघटनेच्या या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी गुणगौरव व स्पर्धा परीक्षा यांसारख्या नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. Taluk Level Scholarship Practice Exam

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTaluk Level Scholarship Practice ExamUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share78SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.