गुहागर, ता. 07 गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने व कॅरम क्लब यांच्या सहकार्याने तालुका स्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा रविवार दि. 10/09/2023 रोजी भंडारी भवन गुहागर येथे घेण्यात येणार आहेत. Taluk Level Carrom Competition at Guhagar


या तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेची प्रवेश फी एकेरी – रू 50/- दुहेरी फी – रू.100/- अशी ठेवण्यात आली आहे. तसेच एकेरी कॅरम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रू.1501/- असून व्दितीय पारितोषिक रू. 1001/- आहे. तर दुहेरी कॅरम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रू.1501/- असून व्दितीय पारितोषिक रू. 1001/- आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकही ठेवण्यात आले आहे. Taluk Level Carrom Competition at Guhagar


तरी इच्छूक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी सचिन साखरकर मोबा. नं. 9307363992 व प्रदीप परचुरे मोबा. नं. 9960878123 यांच्याकडे संपर्क साधावा, असे गुहागर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे. Taluk Level Carrom Competition at Guhagar

