चिपळुण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे ACB ची कारवाई
गुहागर, ता. 23 : चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द गावचा तलाठी (अतिरिक्त पदभार) अश्विन नंदगवळी (वय-३३) याला ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे चिपळूण तालुक्यातील महसूल विभागासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. Talathi was caught taking bribe

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्दचा तलाठी अश्विन नंदगवळी याने दि. १ जून २०२३ रोजी यातील तक्रारदार व त्यांचे सहहिस्सेदार यांच्या नावे असलेल्या बिनशेती जमिनीचे दोन समान हिस्से करून उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण यांच्याकडून बिनशेती जमिन विभाजनाचे आदेश प्राप्त करून घेण्याकरिता उप विभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण येथील कर्मचारी यांच्यासाठी ४० हजार रूपये व वेगळा सातबारा देण्याकरिता मंडळ अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रूपये असे एकूण ४५ हजार रूपयांची लाच रक्कमेची मागणी केल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले. त्याअनुषंगाने, गुरूवार दि. २२ जून २०२३ रोजी सापळा कारवाई दरम्यान तलाठी नंदगवळी याला ४५ हजाराची लाच रक्कम स्वीकारल्यानंतर तलाठी कार्यालय, पिंपळी खुर्द येथे पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. Talathi was caught taking bribe

ही कारवाई पर्यवेक्षक अधिकारी सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, ला. प्र. वि, रत्नागिरी, मार्गदर्शक अधिकारी सुनिल लोखंडे सो, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. ठाणे परिक्षेत्र, ठाणे, अनिल घेरडीकर सो, अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, ठाणे परिक्षेत्र, ठाणे, आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी – मा. उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण ताटे, हे. काँ. संतोष कोळेकर, पो. काँ. हेमंत पवार, पो. काँ. राजेश गावकर, पो. काँ. प्रशांत कांबळे (चालक) यांनी सापळा रचून केली. Talathi was caught taking bribe
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ खालील नमुद क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ACB ने केले आहे. Talathi was caught taking bribe
संपर्क-
1. ला.प्र.वि., रत्नागिरी कार्यालय दूरध्वनी क्र. – (02352-222893)
2. मा. सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (9823233044)
3. प्रविण ताटे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (8055034343) & (7470040707)
4. अनंत कांबळे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि., रत्नागिरी दूरध्वनी क्र. – (7507417072)
5. टोल फ्री दूरध्वनी क्र. – 1064
