भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन सदस्य निलेश सुर्वे यांचे आवाहन
गुहागर, ता. 30 : कामगार विभाग महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटपाच्या मदतीसाठी तालुकास्तरावर तालुका कामगार सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली असून या सुविधा केंद्रांचा थेट लाभ बांधकाम कामगारांनी घेण्याचे आवाहन भाजपाचे गुहागर तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री निलेश विश्वनाथ सुर्वे यांनी केले आहे. Take advantage of Taluka Suvidha Kendra
पूर्वी जिल्ह्याला एकच तालुका कामगार व सुविधा केंद्र होते. यामुळे जिल्हाभरातील कामगारांची फार अवहेलना होत होती. आर्थिक भुर्दंड पडत होता व थेट कामगार या जिल्हास्तरीय तालुका कामगार सुविधा केंद्रात पोहोचत नसल्यामुळे त्यांच्यासाठी असलेल्या लाभापासून मुळचा बांधकाम कामगार हा वंचित राहत होता. विविध संस्था यामध्ये काम करू लागल्या होत्या. यामुळे कामगारांच्या वेळेची जरी बचत होत असली तरी त्यांना थोडाफार आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. ही गोष्ट लक्षात घेऊन आणि शेवटच्या स्तरातील बांधकाम कामगार नोंदणीकृत होऊन त्याला लाभ वाटपाचा फायदा मिळावा या उद्देशाने सन्मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित दादा पवार यांच्या महायुती सरकारमधील बांधकाम मंत्री सन्मा. सुरेश भाऊ खाडे यांनी 15 मार्च 2024 रोजी तालुका कामगार सुविधा केंद्र स्थापन करण्याची अधिसूचना काढली आणि त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. Take advantage of Taluka Suvidha Kendra
त्या निर्णयानुसार रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांनी प्रत्येक तालुका स्तरावरती या लाभाचे वाटप बांधकाम कामगारांना करत या तालुका स्तरावरील कार्यालयांना बळ दिले आहे. गुहागर तालुक्यामध्ये सुरू झालेल्या या तालुका कामगार सुविधा केंद्राला भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी भेट देऊन येथील कामगारांना शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर नियमात आणि निकषात आपण हे काम करून तालुक्यातील गोरगरीब बांधकाम कामगारांना सुद्धा याचा लाभ कसा मिळेल याकडे या कर्मचाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. Take advantage of Taluka Suvidha Kendra
त्याचबरोबर तालुक्यातील सर्व बांधकाम कामगार या संज्ञेमध्ये बसणाऱ्या कामगारांनी आपली नोंदणी या योजनेअंतर्गत करून या योजनेतील कामगारांनी जन्मापासून मृत्यूपर्यंत व मृत्यूनंतर आपल्या वारसांना मिळणाऱ्या योजनेतील लाभाचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. हे लाभ बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी काही संस्था, काही व्यक्ती जर चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर त्याला सुद्धा आळा ठेवण्याचे काम या तालुका कामगार सुविधा केंद्राने केले पाहिजे. अशी सूचना सुद्धा निलेश सुर्वे यांनी दिली आहे. यावेळी तालुका सरचिटणीस सचिन ओक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अपुर्वाताई बारगोडे, शहराध्यक्ष नरेश पवार, तालुका उपाध्यक्ष श्रद्धा घाडे, नगरपंचायत माजी गटनेते उमेश भोसले, शहर सरचिटणीस संतोष सांगळे, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक संजय मालप, कीरण गडदे आदीस बहुसंख्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. Take advantage of Taluka Suvidha Kendra