जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी
रत्नागिरी, ता. 10 : साहित्याचे नोबेल पुरस्कार गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांना १९३१ साली मिळाले. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण देणारी त्यानी शांतिनिकेतनची स्थापना त्यांनी केली. “एकला चलो रे ” हे टागोरांचे गीत साऱ्या बंगालचे गीत आहे. टागोर बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा न्यायाधीश सुनिल गोसावी यांनी केले. Tagore was a multifaceted personality


गुरुवर्य टागोर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालयात आयोजित कार्यक्रमात श्री. गोसावी बोलत होते. जीवनातला निखळ आनंद हरवून टाकणाऱ्या शाळा त्याना मंजुर नव्हत्या. रविंद्रनाथानी निसर्ग भाषा आणि संगीत यावर प्रेम करायला शिकविले. जगातल्या ज्येष्ठ कवीमध्ये रविंद्रनाथाची गणना होते. रविंद्रनाथ कवी, गीतकार, नाटककार, कलाकार, संगीतकार आणि चित्रकार होते. गुरूवर्य टागोर यांचे मोठे बंधू जिल्हा न्यायाधीश होते. ते रत्नागिरीमध्ये असताना सन १८८६/८७ च्या दरम्यान गुरुवर्य टागोर रत्नागिरी जिल्हा न्यायाधीशांच्या निवासात काही काळ मुक्कामाला होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गुरुवर्यांचे देखणे म्युरलचे रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आले आहे. Tagore was a multifaceted personality


जन गण मन हे आपले व आमार शोनार बांगला हे बांगलादेशाच्या राष्ट्र गीताची रचना त्यांची आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रगीताची रचना त्यांच्या सहित्याच्या प्रेरणेतून झाली आहे. गुरुवर्य टागोर व महाराष्ट्राचं नात अनोखे आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाचा अनुवाद तसेच छत्रपती शिवाजी महाराजावरील खंडकाव्य त्यांनी रचले होते, असे प्रतिपादन रत्नागिरी बारचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश श्री. अंबळकर, जिल्हा सरकारी वकील अनिरुद्ध फणसेकर उपस्थित होते. विधी सेवा प्राधिकरणाचे एन. जे. गोसावी यांनी प्रास्ताविक केले. महिला उपाध्यक्ष ॲड. शाल्मली आंबुलकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन ॲड. मिरा देसाई यांनी केले. आभार ॲड. पराग शिंदे यांनी मानले. Tagore was a multifaceted personality