९ जूनला होणार भारत-पाकिस्तान सामना
दिल्ली, ता. 06 : आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा १ ते २९ जून दरम्यान २० संघांमध्ये होणार आहे. २९ जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना होणार आहे. भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत- पाकिस्तान सामना ९ जून रोजी होणार आहे. T20 World Cup schedule announced by ICC
टी-२० वर्ल्ड कप हा १ जूनपासून सुरु होणार आहे. हा वर्ल्ड कप वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन्ही देशांत संयुक्तपणे खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना हा आयर्लंडबरोबर होणार आहे. भारत वआयर्लंड यांच्यातील लढत पाच जूनला होणार आहे. भारताचा या वर्ल्ड कपमधील दुसरा सामना हा पाकिस्तानबरोबर होणार आहे. ९ जूनला भारत व पाकिस्तान सामना होणार आहे. त्यानंतर १२ जूनला भारत अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. या तीन लढती न्यूयॉर्कला होणार आहेत. T20 World Cup schedule announced by ICC


आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांमध्ये एक ट्रॉफीसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. या 20 संघांमध्ये टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 10 संघांनी थेट वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय केलं. तर स्कॉटलँड,आयर्लंड, पापुआ न्यू गिनी, कॅनेडा, नेपाळ, ओमान, नामिबिया आणि यूगांडा या संघांनी पात्रता फेरीतून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. तर अमेरिका आणि वेस्ट इंडिज हे यजमान आहेत. त्यामुळे या 2 संघांना थेट तिकीट मिळालं. T20 World Cup schedule announced by ICC
वर्ल्ड कपमध्ये 1 ते 18 जून दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर 19 जून ते 24 जून दरम्यान सुपर 8 फेरी पार पडेल. 2 सेमी फायनल सामने अनुक्रमे 26 आणि 27 जून रोजी पार पडतील. तर 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे. आयसीसीने या टी 20 वर्ल्ड कपसाठी 20 संघांना 4 ग्रुपमध्ये विभागलंय. त्यानुसार एका ग्रुपमध्ये 5 संघांचा समावेश करण्यात आला आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनेडा आणि यूएसएचा समावेश आहे. बी ग्रुपमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड आणि ओमान आहे. सी ग्रुपमध्ये न्यूझीलंड, 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, यूगांडा आणि पापुआ न्यू गुनिया आहे. तर डी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि नेपाळ टीम आहे. T20 World Cup schedule announced by ICC