रत्नागिरी, ता. 06 : दिनांक १० व ११ मार्च, २०२३ रोजी सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जी 20 मधील 20 प्रमुख देशांतील युवक व युवती मते मांडण्यासाठी सहभागी होत आहेत. या स्पर्धेत देवरुखच्या नामांकित आठल्ये सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे स्वरूप प्रकाश दोरखडे व पायल तानाजी दोरखडे हे दोन विद्यार्थी रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. Swaroop and Payal will lead the district in Youth 20

पायल व स्वरूप हे आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्गात शिकत आहेत. या दोघांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व युथ 20 प्रोग्रेसच्या संयोजक प्राध्यापक डॉ. वर्षा फाटक यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय परिषदेत निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर वर्गाने या विद्यार्थ्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Swaroop and Payal will lead the district in Youth 20